हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय..! तुमची काय तक्रार आहे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:24 AM2021-01-01T00:24:42+5:302021-01-01T11:51:51+5:30

गृहमंत्री आदेश देतात, पुढच्या 3 मिनिटात....

Voice off after Home Minister's order | हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय..! तुमची काय तक्रार आहे ?

हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय..! तुमची काय तक्रार आहे ?

googlenewsNext

पुणे: नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, तुमची काय तक्रार आहे?  आमच्याकडे सोसायटीत खूप आवाज सुरू आहे तो कमी करायला सांगा? त्यानंतर गृहमंत्री आदेश देतात, पुढच्या 3 मिनिटात सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवसागर सोसायटीत पोहचतात आणि तेथील आवाज बंद होतो. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज रात्री पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात जाऊन मध्यरात्री पोलिसांबरोबर नवे वर्षाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षात आलेला फोन घेतला व तक्रारदाराची तक्रार ऐकून घेतली. 12वाजून 2 मिनिटांनी ही तक्रार आली. पोलीस पुढील 3 मिनिटात घटनास्थळी पोहचले होते.  त्या अगोदर देशमुख यांनी सर्वांबरोबर केक कापला.

यावेळी देशमुख म्हणाले, गेली 10 महिने पोलीस, डॉक्टर, परिचारिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस थकले जरूर आहेत. पण हिंमत हरलेले नाहीत.  कोरोनविरुद्धच्या या लढाईत एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या बरोबर नव्या वर्षाची सुरुवात करायला मिळाली याचा मला आनंद आहे. तसाच आनंद त्यानाही झाला असेल. हे नवीन वर्ष निश्चितच कोरोनामुक्त असेल.

'थर्टी फर्स्ट'ची रात्र ही सर्वसामान्य जनतेसाठी 'सेलिब्रेशन'ची असली तरी पोलिसांना मात्र डोळ्यात तेल घालून जागरूक राहावे लागते. म्हणूनच राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या स्वागताच्या क्षणी पोलिसांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पुणे पोलीस आयुक्तालयात ते रात्री आले. सरत्या वर्षावर कोरोनाचे मळभ होते. आगामी वर्ष आशादायी असणार आहे. यासाठी 'होप २०२१' असे लिहिलेला केक देशमुख यांनी पोलीस सहकार्यांसमवेत कापला. इतक्या रात्री एखाद्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्तालयात असण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग होता.

Web Title: Voice off after Home Minister's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.