भोरला अनियमित पाणी

By admin | Published: December 9, 2014 12:05 AM2014-12-09T00:05:23+5:302014-12-09T00:05:23+5:30

अनियमित तसेच कमी वेळ आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठय़ामुळे भोर शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपलिकेचे कर्मचारी उद्धट उत्तरे देतात.

Volcanic irregular water | भोरला अनियमित पाणी

भोरला अनियमित पाणी

Next
भोर : अनियमित तसेच कमी वेळ आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठय़ामुळे भोर शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपलिकेचे कर्मचारी उद्धट उत्तरे देतात.  सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी वारंवार मागणी  करूनही दुर्लक्ष होते. त्यामुळे आज संतप्त तरुणांनी थेट मुख्याधिका:यांपुढे तक्रारींचा पाढा वाचला.
शहराला शंकर हिल येथील टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. नवी आळी, मदार मोहल्ला व मंगळवार पेठेत  एकाच वेळी पाणीपुरवठा होतो. उतार असल्याने पाणी खाली जाते व पाईपलाईन जुनी असल्याने गळती होते. त्यामुळे मंगळवार पेठेत वेळेवर पाणी येत नाही. परिणामी, महिलांना पाण्याची वाट पाहत थांबावे लागते. पाणी आले तरी कमी दाबाने येते. मोटारीचा (पंप) वापर करावा लागतो. 
याबाबत नगरपलिकेच्या कर्मचा:यांना विचारले, तर ‘येतंय तेवढं घ्या!’ असे उद्धट उत्तर दिले जाते. 
या कर्मचा:यांची प्रथम बदली करा, अशी मागणी तरुणांनी मुख्याधिका:यांकडे केली. या वेळी मारुती सागळे, संतोष वीर, विजय आंबवले, महेश उल्हाळकर, संजय आंबवले, गणोश धोत्रे, लहू सागळे, पोपट जाधव, अक्षय सागळे, प्रवीण सागळे, पिंटू धोत्रे व तरुण उपस्थित होते.
भाटघर धरण उशाला असूनही शहराला पाणी पुरवठा करण्यास अडचणी कशाकाय येतात? धरण उशाला कोरड घशाला अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे. 
शहराला पाणी पुरवठा करणा:या टाक्यांची क्षमता वाढविण्याची गरज आहे. जुन्या पाईप लाईनही नादुरुस्त आहे त्यातूनही मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. 
 
4मंगळवार पेठ ही मुख्य बाजारपेठ आहे. किराणा, व्यापारी, कापड दुकाने आहेत. मात्र, पालिकेतील कर्मचा:यांमुळे अनेक दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. याकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी शेवटी पालिकेकडे आपला मोर्चा वळविला. 
 
सदरच्या पाईपवर तीन आळ्यांचा पाणीपुरवठा होतो. शिवाय, पाईपलाईन जुनी असल्याने गळते. उतारही आहे. यामुळे पाणीपुरवठा होत नसेल. याची महिती घेऊन मंगळवार पेठेतील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत केला जाईल 
- संजय केदार, मुख्याधिकारी 

 

Web Title: Volcanic irregular water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.