स्वेच्छानिवृत्तीने वाढेल आर्थिक भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:19+5:302021-01-09T04:09:19+5:30
एसटी महामंडळाने नुकतीच पन्नाशी ओलांडलेले कर्मचारी व अधिकाºयांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे. एसटी कर्मचाºयांचे सध्याचे निवृत्तीचे वय ५८ ...
एसटी महामंडळाने नुकतीच पन्नाशी ओलांडलेले कर्मचारी व अधिकाºयांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे. एसटी कर्मचाºयांचे सध्याचे निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. पण लॉॅकडाऊनमुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मुळचे सोलापुर जिल्ह्यातील प्रमोद नखाते हे तळेगाव आगारात वाहक आहेत. मागील २२ वर्षांपासून कार्यरत आहेत. दोन मुलींचे लग्न झाले. आता एक मुलगा बारावी उत्तीर्ण व मोठी मुलगी एम.कॉम.चे शिक्षण घेत आहे. स्वत:चे घर नाही. पत्नीलाही नोकरी नाही. त्यामुळे नखाते यांच्या वेतनावरच घर चालते. त्यांचे एकुण वेतन २९ हजार असले तरी हप्ते जाऊन हातात ११ हजार रुपये येतात. त्यातच अडीच हजार रुपये घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दैनंदिन घरखर्च कसाबसा भागवावा लागतो. स्वेच्छानिवृत्तीनंतर वेतन बंद झाल्यास आर्थिक डोलाराच कोलमडेल, असे ते सांगतात.
--------------
योजनेअंतर्गत स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाºया कर्मचाºयांना निवृत्तीसाठी शिल्लक राहिलेल्या वर्षाचे दरवर्षी तीन महिन्यांचे महागाई भत्त्यासह वेतन दिले जाणार आहे. एसटीतील बहुतेक कर्मचारी कर्जबाजारी आहेत. मिळणारे वेतन तुटपुंजे असल्याने त्यात संपुर्ण घरखर्च भागत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण व इतर खर्चासाठी कर्ज घ्यावे लागते. या हप्त्यांमध्येच निम्म्याहून अधिक पगार जातो, अशी स्थिती बहुतेक कर्मचाºयांची आहे.
----------
पुणे विभागातील आगार - १३
एकुण कर्मचारी - सुमारे ५ हजार ७५०
------------
सध्या उत्पन्नाचा दुसरा स्त्रोतही नाही. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यास मिळणारी ग्रॅच्युएटी व इतर रक्कम कर्ज फेडण्यातच जाईल. त्यामुळे घर कसे चालवायचे, हा प्रश्न निर्माण होईल. तसेच पैसे कधी मिळणार याचीही खात्री नसल्याने भिती वाटते.
- प्रमोद नकाते, वाहक
----------
मी नोकरी करत होते. पण कंपनीतून काढून टाकण्यात आले. स्वेच्छानिवृत्ती बंधनकारक केल्यास घर चालविणे कठीण होईल. आताच कसरत करावी लागते. मिळेत ते काम करतो. अजून दोन मुलांचे शिक्षण सुरू आहे.
- अश्विनी नकाते, गृहिणी
------------