मतदान करा, स्वीटचा आस्वाद मोफत

By admin | Published: February 16, 2017 03:36 AM2017-02-16T03:36:35+5:302017-02-16T03:36:35+5:30

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अभियान राबविले जात असून, त्यात शहरातील पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स

Vote, sweet taste free | मतदान करा, स्वीटचा आस्वाद मोफत

मतदान करा, स्वीटचा आस्वाद मोफत

Next

पुणे : मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अभियान राबविले जात असून, त्यात शहरातील पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनही सहभागी होत आहे़ मतदान केल्याची खूण दाखवेल, त्या प्रत्येकाला या संघटनेचे सदस्य असलेल्या पुण्यात ७०० हॉटेलमध्ये एका स्वीटचा मोफत आस्वाद घेता येईल.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या असोसिएशनच्या सदस्यांबरोबर बैठक घेतली़
तीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या अभियानात आपण कशा प्रकारे आपला सहयोग देऊ शकता, याची विचारणा केली़ त्या वेळी त्यांनी मतदान करून आलेल्या प्रत्येकाला हॉटेलतर्फे एक स्वीट मोफत दिले जाईल, असे सांगितले़ या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष गणेश शेट्टी, तसेच पदाधिकारी किशोर सरपोतदार, संजीत लांबा,
जवाहर चोरगे, प्रफुल्ल चांदवडकर, विश्वनाथ पुजारी, विक्रम शेट्टी आदी सहभागी झाले होते़
हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शहरातील अनेक संघटना,
संस्थांनी सामाजिक जाणिवेतून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Vote, sweet taste free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.