मतदार याद्या होनार शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:20+5:302020-12-11T04:29:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदारांची नावे तत्काळ हटविण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस ...

Voter Lists Honar Pure | मतदार याद्या होनार शुद्ध

मतदार याद्या होनार शुद्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदारांची नावे तत्काळ हटविण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्दीची तारीख १० डिसेंबर ऐवजी १४ डिसेंबर केल्याची माहिती निवडणूक आयोगाने कळविली आहे. यास हवेलीचे तहसिलदार सुनील कोळी यांनी दुजोरा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदारांची नावे वगळण्याबाबत बीएलओ, ग्रामसेवक, कोतवाल तलाठी, मंडलाधिकारी यांना योग्य ते आदेश दिल्याची माहिती कोळी यांनी दिली.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर, मांजरी खुर्द, वडकी या ग्रामपंचायतीसह राज्यभरातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या मतदारयादीत, संबधित ग्रामपंचायतीच्या शेजारील गावातील मतदारांची नावे दाखल झालेच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेल्या होत्या. याची दखल घेत राज्य निवडणूिक आयोगाने वरील आदेश दिले आहे. यामुळे राज्यभरातील १४ हजार २३५ ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या शुद्द होणार आहेत.

जिल्हातील साडेसातशेहुन अधिक ग्रामपंचायतीसह राज्यभरातील १४ हजार २३५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुका पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार आहेत. या निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने प्रसिध्द केलेल्या मतदार याद्यात, ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील अनेक मतदारांची नावे आली असल्याची बाब उघडकीस आली होती. सदोष मतदार याद्यांचा सर्वाधिक फटका लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना बसला होता. लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही बड्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत दौंड तालुक्यातील हजारो मतदारांची नावे घुसडल्याचे उघडकीस आले होते. याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांच्यासह राज्यभरातील अनेकांनी मतदार याद्या दुरुस्तीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच, निवडणुक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर निवडणुक आयोगाने आदेश दिल्याने, राज्यभरातील चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोट

ग्रामपंचायतीच्या राजकारणात काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ऑनलाईन प्रक्रियेतून आपल्या मर्जीतील गावाबाहेरील मतदारांची नावे मतदार यादीत घुसडली आहेत. याबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या आहेत. याविषयी काहींनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. निवडणूक आयोगाने हद्दीबाहेरील मतदारांची नावे वगळण्याबाबत स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी कार्यालयांना दिल्यामुळे मतदार यादीत बोगस नावे लावणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे.

-

सुनील कोळी, तहसिलदार हवेली पुणे :- मतदारांबाबत मतदान केंद्रस्तरीय

चौकट

अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) क्षेत्रीय तपासणी करुन अहवाल मागितला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बाहेरील मतदारांच्या नावांची खातरजमा झाल्यानंतर त्याबाबत बोलके आदेश पारीत करुन त्यानंतरच हद्दीबाहेरील मतदारांची नावे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतिम मतदार यादी तयार करताना समाविष्ट न करणेबाबत स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. यामुळे १४ डिसेंबरला हवेलीतील ५४ ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Web Title: Voter Lists Honar Pure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.