पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान

By नितीन चौधरी | Published: September 9, 2023 04:23 PM2023-09-09T16:23:17+5:302023-09-09T16:24:51+5:30

यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांमध्ये १४ सप्टेंबरला महाविद्यालयातील पात्र नवमतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे...

Voter registration campaign to increase participation of 3 lakh youth in Pune district towards voter registration | पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान

पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ, सहभाग वाढिवण्यासाठी विशेष नोंदणी अभियान

googlenewsNext

पुणे : जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ३ लाख ५९ हजार ८३९ असून या वयोगटातील मतदार संख्या केवळ ६५ हजार ८५१ आहे. त्यामुळे २ लाख ९३ हजार ९८८ युवकांनी अजुनही मतदार नोंदणी केलेली नाही. तसेच पुणे शहरात राज्याच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी शिक्षणासाठी ३ ते ५ वर्षे वास्तव्य करीत असल्याने त्यांची मतदार नोंदणी पुण्यात किंवा त्यांच्या मूळगावी होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांमध्ये १४ सप्टेंबरला महाविद्यालयातील पात्र नवमतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. 

याबाबत महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक व्हावी यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. आयोगाच्या सूचनेनुसार नागरिकांना वर्षातून चार वेळा म्हणजेच १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना बैठकीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली असून समन्वयक अधिकारी आणि दोन प्रतिनिधींना ऑनलाईन मतदार नोंदणीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असे देशमुख म्हणाले.

या अभियानात भाग घेतलेल्या समन्वयक विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सहभागी विद्यार्थ्यांचा २५ जानेवारी २०२४ रोजीच्या राष्ट्रीय मतदार दिनी गौरव करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार इत्यादी तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित केलेले १० वी किंवा १२ वीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक असल्याची ते म्हणाले.

Web Title: Voter registration campaign to increase participation of 3 lakh youth in Pune district towards voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.