महाविद्यालयांतही मतदारनोंदणीची सोय

By admin | Published: September 15, 2016 01:26 AM2016-09-15T01:26:58+5:302016-09-15T01:26:58+5:30

महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, मतदानापासून पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबरला विशेष मतदार

Voter registration facilities in colleges | महाविद्यालयांतही मतदारनोंदणीची सोय

महाविद्यालयांतही मतदारनोंदणीची सोय

Next

पिंपरी : महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, मतदानापासून पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबरला विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली जाणार असून, दि. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी या अंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.
आयुक्तम्हणाले, ‘‘आयोगातर्फे दि. १६ सप्टेंबर २०१६ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत पालिका कार्यक्षेत्रात (२०५-चिंचवड, २०६-पिंपरी, २०७-भोसरी विधानसभा व २०३-भोर (ताथवडे भाग) या विधानसभा कार्यक्षेत्रात १२०० मतदार केंदे्र आहेत. पालिकेची सर्व (६) क्षेत्रीय कार्यालये, १४ महाविद्यालयांत मतदार सहायता केंद्र दि. १ आॅगस्ट २०१६पासून कार्यान्वित करण्यात आली आहेत. या ठिकाणी १४ आॅक्टोबरला मतदार नोंदणीचे अर्ज सादर करता येणार आहेत. १ जानेवारी २०१७ला वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांना, ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा पात्र मतदारांना मतदार म्हणून नावे नोंदविण्याची संधी उपलब्ध असणार आहे. पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची सुविधा ही उपलब्ध करून दिली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी थेरगाव येथील मनपा शाळा येथे, तर पिंपरी मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी आकुर्डी स्टेशनजवळील डॉ. हेडगेवार भवनात, भोसरी मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी नेहरुनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे, तर भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी भोर येथील प्रांत कार्यालयात मतदार नोंदणीसाठी संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)


१४ महाविद्यालयांतदेखील मतदार नोंदणी
१४ महाविद्यालयांतदेखील मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. सांगवी येथील बाबूराव घोलप विद्यालय, पिंपरी येथील मानघनमल उधराम कॉलेज आॅफ कॉमर्स, चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, पिंपरी येथील डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानचे इ अँड टीसी कॉलेज, निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी कॉलेज, निगडी प्राधिकरण येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, चिंचवड स्टेशन येथील एटीएसएस कॉलेज आॅफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्प्युटर अप्लिकेशन, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज, भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चिंचवड येथील रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट, ताथवडे येथील राजश्री शाहू कॉलेज, रावेत रोड ताथवडे येथील बालाजी लॉ कॉलेज, वाकड येथील इंदिरा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.


जागृतीवर भर
जागृतीसाठी गणेशोत्सव मंडळांना ध्वनिमुद्रित केलेल्या सी.डी.चे वाटप केले आहे. २ लाख पत्रके वाटपाचे काम सुरू असून, गॅस धारकांसाठी सिलिंडरवर स्टिकर्स चिकटवले आहेत. पाणीपट्टीच्या बिलासमवेत मतदार जनजागृतीची पत्रके वितरित केली आहेत. घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवर मतदार नोंदणी करण्याबाबतची जनजागृती करणारे स्टिकर्स व ध्वनिफीत लावण्यात येणार आहे. पथनाट्येही सादर होणार आहेत.’’

Web Title: Voter registration facilities in colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.