नवीन मतदान केंद्रांमुळे मतदारांची डोकेदुखी
By admin | Published: February 21, 2017 03:09 AM2017-02-21T03:09:55+5:302017-02-21T03:09:55+5:30
वारजे कर्वेनगर भागात मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यंदा अनेक ठिकाणी नव्याने मतदार केंद्रे निर्माण झाल्याने
वारजे : वारजे कर्वेनगर भागात मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यंदा अनेक ठिकाणी नव्याने मतदार केंद्रे निर्माण झाल्याने नेहमीच्या मतदान केंद्रावर मतदानास गेलेल्या मतदारांचा काही प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
वारज्यात जुन्या केंद्राबरोबरच विरंगुळा केंद्र, मजेस्टीक हॉल, शोबपुरम, अतुलनगर, नादब्रम्ह, स्वेदगंगा, ज्ञानेश, पॉप्युलर प्रेस्टीज या सोसायट्यांचे हॉल, सेवालाल समाज मंदिर, वारजे गाव चावडी या नव्या ठिकाणी मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी एक दोनच बूथ ठेवण्यात आले असले, तरी ऐन वेळी मतदानास आलेल्या मतदाराला आपले केंद्र बदलले असल्याचे समजल्यावर त्यांचा गोंधळ उडू शकतो. त्यासाठी सर्वांनी मतदान केंद्राची खात्री करूनच केंद्रावर जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्वेनगरमध्ये अनेक नव्या केंद्र्राची भर पडली आहे. दरम्यान, वारजे येथील रामनगर भागात काही जण पैसे वाटप करत असल्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्षास तक्रार करण्यात आली. यावरून वारजे पोलिसांनी रामनगर भागातून काही कार्यकर्ते व नागरिकांना ताब्यात घेतले.