मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू
By admin | Published: July 20, 2015 03:34 AM2015-07-20T03:34:09+5:302015-07-20T03:34:09+5:30
मतदार यादीतील दुबार नावे, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार यादी तयार करणे, तसेच छायाचित्र,
पुणे : मतदार यादीतील दुबार नावे, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार यादी तयार करणे, तसेच छायाचित्र, मतदार ओळखपत्र व आधारकार्ड जोडणी कार्यक्रमाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. हे काम २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नाहीत अशा स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांना वगळणी नोटिसा बजावण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत, अशांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे फोटो जमा करावेत. एकापेक्षा जास्त मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांनी एकाच मतदार यादीत नाव जसेच्या तसे ठेवायचे त्याबाबत सांगावे. मतदार मयत असल्यास नातेवाइकांनी मृत्यू प्रमाणपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मोहिमेदरम्यान मतदार यादीतील पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून नाही. अशा मतदारांची नावे संभाव्य वगळणी मतदार यादीमध्ये घेतली जाणार आहेत. वगळणी यादीतील मतदारांनी २७ जुलै ते २९ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.