आज मतदार 'राजा'

By admin | Published: February 21, 2017 02:16 AM2017-02-21T02:16:50+5:302017-02-21T02:16:50+5:30

जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ७.३० ते सायंकाळी

Voters 'Raja' today | आज मतदार 'राजा'

आज मतदार 'राजा'

Next

पुणे: जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र मतदान होणार आहे.
उद्याचा दिवस हा संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असणार असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदारराजा मतपेटीत बंद करणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी सुमारे ३७५ तर पंचायत समितीसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
यावेळी प्रथमच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेनेसह भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत असून, बहुतेक सर्व ठिकाणी ही चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तब्बल २२ हजार २५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, म्
ातदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तीन वेळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रत्येक केंद्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशा दोन स्वतंत्र ईव्हीएम मशीन देण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ हजार ३६९ केंद्रांसाठी १० हजार २०० बॅलेट युनिट व ७ हजार ४८० कंट्रोल युनिटचा वाटप केला जाणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार

जुन्नर ३९ (७१), आंबेगाव २४(४०), शिरुर २६(४५), खेड २४(४५), मावळ २०(४४), मुळशी १६(३४), हवेली ६३(११७), दौंड ३८(४८), पुरंदर १८(३८), वेल्हा १३(२२), भोर १२(२३), बारामती ३७(५४), इंदापूर ४५(६२)


आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र ३४४

क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
या वेळी प्रथमच जिल्ह्यात कोणत्याही स्वरुपाची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, मतदान यंत्र बंद पडले, काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा कोणत्याही स्वरुपाची अडचण निर्माण झाल्यास जिल्ह्यात ३४४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये या अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन अधिकचे मतदान यंत्र देण्यात आली असल्याचे निवडणूक समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

८४ मतदान केंदे्र संवेदनशील

जिल्ह्यात ८४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्वांधिक ३० हवेली तालुक्यात संवदेनशील मतदान केंदे्र आहेत. खेड १३, दौंज १३, आंबेगाव ११, शिरुर ९, मावळ ७, इंदापूर १ संवेदनशील मतदान केंद्राच समावेश आहे. दरम्यान प्रत्येक तालुक्यात दहा आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात असून, येथे पहिल्यादाच मतदान करणा-या मतदारांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

उमेदवाराची कुंडली मतदान केंद्राच्या बाहेर लावणार
 जिल्ह्यातील प्रत्येक
मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांची संपत्ती, त्यांच्यावर दाखल
असलेले गुन्हे याबाबत संक्षिप्त स्वरूपातील
माहिती प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर दर्शनी भागावर लावण्यात
येणार आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदार

४जिल्ह्यात एकूण २७ लाख ९२ हजार ७७३ मदातर असून, यामध्ये १४ लाख १६ हजार ७११ पुरुष तर १३ लाख २ हजार ४४६ महिला मतदार  आहेत. यामध्ये तालुकानिहाय मतदार याप्रमाणे- जुन्नर २ लाख ६३  हजार, आंबेगाव १ लाख ७२ हजार, शिरुर २ लाख ३७ हजार, खेड २ लाख ४४ हजार, मावळ १ लाख ७६ हजार, मुवशी १ लाख २१ हजार, हवेली ४ लाख ५१ हजार, दौंड २ लाख ३५ हजार, बारामती २ लाख ४७ लाख, इंदापूर २ लाख ६६ हजार

Web Title: Voters 'Raja' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.