मतदारांनो जागे व्हा मतदानाचा हक्क बजावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:20+5:302021-01-03T04:13:20+5:30
उरुळीकांचन : लोकशाहीत मतदानाला अनन्य साधारण महत्व आहे. मतदान हा मुलभूत अधिकार असतांनाही अनेकजन हा हक्क न ...
उरुळीकांचन : लोकशाहीत मतदानाला अनन्य साधारण महत्व आहे. मतदान हा मुलभूत अधिकार असतांनाही अनेकजन हा हक्क न बजावता मतदानाच्या दिवशी सुट्टी साजरी करतात. त्यांना त्यांना हक्काची जाणिव व्हावी या यासाठी एक अवलीया गेल्या ५० वर्षांपासून धडपडत आहे. बापूराव गुंड असे या धैय्यवेड्या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या गाडीवर मतदान जागृतीचे फलक घेऊन गुंड हे मतदान करण्यासाठी जागृती करत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणूका असून यासाठी प्रत्येक गावात जाऊन ते मतदानासाठी जागृती करत आहेत.
हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथील रहिवासी असलेला बापूराव गुंड यांचे वय ५२ आहे. त्यांनी समाजशास्त्रात एम.एम केले आहे. लोकशाहीत मतदान हा मुलभूत हक्क आहे. मात्र, या हक्का प्रती नागरिकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. आपल्या मतावर लोकप्रतिनिधी निवडणून येत असतात. यासाठी जागरूक राहून मतदान करणे गरजेचे असते. नागरिकांमध्ये ही जागरूकता यावी यासाठी गुंड हे गेल्या ३५ वर्षांपासून धडपडत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान उमेदवार जसा प्रचार करतात तशा पद्धतीने मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी गुंड हे त्यांच्या दुचाकीवर गावोगावी फिरतात.
चौकट
दुचाकी, शर्टवर मतदान जागृतीचे फलक
गुंड यांनी मतदान जागृतीसाठीअनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी त्यांच्या गाडीवर आकषर्षक असे मतदान जागृतीचे फलक लावले आहे. ऐवढेच नाही तर त्यांच्या अंगातील शर्टावरही मतदान जागृतीचे संदेश लिहिले आहे. त्यांचा हा पेहराव येणा जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या ते उरूळी कांचन येथे मतदान जागृतीसाठी आले आहेत. येथे आपली गाडी लाऊन हातात फलक घेऊन मतदार राजाला मतदान करण्यासाठी साद घालत आहेत.