मतदारांना आज आपले मतदान कार्ड डाऊनलोड करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:23+5:302021-08-14T04:15:23+5:30
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवार (दि. १४) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता या कालावधीत २५ ...
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवार (दि. १४) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता या कालावधीत २५ सप्टेंबर २०२० ते १५ जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी केलेल्या मतदारांना आपले मतदान कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ पूर्वी आणि कार्यक्रमानंतर मतदार नोंदणी करताना मोबाईल क्रमांक नोंदविलेले मतदार ई- मतदान कार्ड डाऊनलोड करण्यास पात्र आहेत. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ नंतर नोंदणी केलेल्या २९ लाख मतदारांची आणि विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ अंतर्गत उर्वरित मतदारांची मतदार यादीमध्ये मोबाईल क्रमांक नोंदविलेले यादी मतदारांच्या मोबाईल दूरध्वनी क्रमांकासह उपलब्ध करणार आहे.
या कामकाजास कालमर्यादा असून एका तासाच्या कालावधीतच कार्यक्रमाची अंमलबजावणी याच वेळेत करण्याची दक्षता घ्यावी असेही आयोगाचे निर्देश आहेत, असेही सावंत यांनी कळविले आहे.