हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:27 PM2023-04-28T13:27:01+5:302023-04-28T13:27:25+5:30

निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी ,ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात

Voting begins for 18 seats of Haveli Agricultural Income Market Committee By noon, polling was up to 33.09 percent | हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान

googlenewsNext

पुणे: हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी शुक्रवारी सकाळ पासून मतदान सुरू आहे. या १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ४ मतदान केंद्र असून, ३१ मतदान बुथवर १७ हजार ७४६ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. 

वीस वर्षांनंतर ही निवडणूक हवेली बाजार समितीची लागल्याने ती अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी ,ग्रामपंचायत, आडते -व्यापारी , हमाल मापारी या  चार गटातील उमेदवार रिंगणात आहेत. त्या त्या विभागातील मतदार यांना बाहेर काढून मतदान करण्यासाठी चुरस लागली आहे. सकाळपासून बूथ केंद्रांवर गर्दी सुरू आहे. यामध्ये मतदार पेक्षा , राजकीय मंडळी ,सामाजिक संस्था संघटनेचे नेते तसेच मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत दोन तासात १३ टकक्यांपर्यंत मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी सांगितले. 

मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली आहे. सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. व्यापारी आडते मतदार संघातून २ जागेसाठी सर्वाधिक मतदार आहेत . यामध्ये १२ उमेदवार रिंगणात उतरवले असून जय शारदा गणेश पॅनल व जनशक्ती पॅनल व व्यापारी विकास पॅनल यामध्ये खरी लढत आहे. तर तर हमाल मापाडी या संघातून एक जागेसाठी ५ जण रिंगणात आहेत. यामध्येही चुरस सुरू आहे.

Web Title: Voting begins for 18 seats of Haveli Agricultural Income Market Committee By noon, polling was up to 33.09 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.