लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:15+5:302021-09-18T04:12:15+5:30
--- जुन्नर : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करणे ही आपली ...
---
जुन्नर : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येक नागरिकाने उत्साहात मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.
जुन्नर येथे कल्याण पेठ गणेशोत्सव मित्र मंडळ व जुन्नर तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अभियान या उपक्रमाचे आयोजन केले होते. या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे, माजी नगरसेवक वैभव मलठनकर, अध्यक्ष तेजस बोठे, मनेश बुट्टे-पाटील, मीननाथ पानसरे, विनायक गोसावी, उपाध्यक्ष साहिल गोसावी, आशिष गोसावी, गणेश चौधरी, ऋषिकेश रेंगड़े, अजित बोचरे, गणेश कर्मे, नरेश शहा, ओंकार पवार, सूरज गायकवाड़, अभिषेक शिंदे, अजय फुले, आकाश फुले, स्वप्निल दप्तरे यांसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी जुन्नर नगर परिषदेचे अग्निशामन दलाचे कर्मचारी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. तसेच त्यांना सन्मानित करण्यात आले.