उत्साहामुळे वाढला मतदानाचा टक्का

By admin | Published: October 16, 2014 06:18 AM2014-10-16T06:18:25+5:302014-10-16T06:18:25+5:30

पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४१८ मतदान केंद्रांवर ४६.२६ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का ३.६१ने अधिक आहे.

Voting percentage increased due to enthusiasm | उत्साहामुळे वाढला मतदानाचा टक्का

उत्साहामुळे वाढला मतदानाचा टक्का

Next

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४१८ मतदान केंद्रांवर ४६.२६ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का ३.६१ने अधिक आहे. एकूण १ लाख ७६ हजार ६७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ९७ हजार ३६१ इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या ७९ हजार ३११ इतकी आहे. तर इतर दोन मतदारांचा समावेश आहे. तरुणांचा उत्साह अधिक दिसून आला.
किरकोळ बाचाबाचीच्या घटना वगळता मतदान शांततेत झाले.
मतदार यादीतील नाव शोधून भाग क्रमांक, मतदान केंद्रातील खोली क्रमांक शोधून देण्यासाठी कार्यकर्ते लॅपटॉप घेऊन सज्ज होते. मात्र, सकाळी ९ वाजले तरी मतदार मात्र बाहेर पडले नाहीत. ९ ते ११ या वेळेत १२ टक्के
मतदान झाले.

३ मतदान केंद्रांवर अवघे २ टक्के मतदान
पिंपरी कॅम्पातील इंदिरा गांधी विद्यालयातील ३ मतदान केंद्रांवर दुपारी १ वाजेपर्यंत केवळ २ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. हे सर्वात नीचांकी मतदान आहे. मात्र दुपारनंतर या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर सहा वाजल्यानंतरही मतदान सुरू होते.
स्वयंसेवक कसले?
पिंपरीत नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या इमारतीतील दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रांवर अपंग, वृद्ध आणि आजारी अशा मतदारांना नेण्यासाठी डोलीची व्यवस्था केली होती. या डोली उचलण्यासाठी नेमणूक केलेले स्वयंसेवक डोली उचलून नेण्याच्या क्षमतेचे नव्हते. त्यांचीच अवस्था अत्यंत केविलवाणी झाल्याचे दिसून येत होते. पोलीस व्हॅनमध्ये टाकून पुण्यातून काही लोकांना पिंपरीत आणले होते. त्यांच्यातील बहुतांश नशेबाज जाणवत होते. त्यांच्याकडे पाहून अपंग, वृद्ध डोलीत बसण्यास कचरत होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुण्यात मजूर म्हणून काम करतो, पण साहेबांनी ५०० रुपये मिळतील असे सांगितले म्हणून आलो अशी कबुलीच त्यांनी दिली.

Web Title: Voting percentage increased due to enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.