गावकी-भावकीत चुरशीने मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 09:12 AM2022-12-19T09:12:06+5:302022-12-19T09:12:55+5:30

गावकी-भावकीच्या राजकारणात जिल्ह्यात चुरशीने मतदान....

Voting strongly among villagers; 81 percent polling for 221 gram panchayats in Pune district | गावकी-भावकीत चुरशीने मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

गावकी-भावकीत चुरशीने मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

Next

पुणे : जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सुमारे ८१ टक्के इतके भरघोस मतदान झाले. चुरशीने झालेल्या या मतदानानंतर आता सबंध जिल्ह्याचे लक्ष मंगळवारी (दि. २०) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सर्वाधिक मतदान मुळशी तालुक्यात ८५.८२ तर सर्वांत कमी मतदान खेड तालुक्यात ७२.११ टक्के झाले. गावकी-भावकीच्या राजकारणात जिल्ह्यात चुरशीने मतदान झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २२१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. त्यानुसार १८५३ सदस्यपदांसाठी व २२१ सरपंचपदांसाठी ही निवडणूक झाली. त्यापैकी ७१२ जागा बिनविरोध झाल्या. तर ७९ जागांसाठी एकही अर्ज आला नव्हता. २२१ सरपंचपदांपैकी ५ जागांसाठी एकही अर्ज आला नाही तर ४९ ठिकाणी बिनविरोध निवड झाली. २७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या. त्यानंतर रविवारी १७६ ग्रामपंचायतींमधील १०६२ सदस्य तर १६७ सरपंचपदांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली.

सकाळी साडेसातला सुरू झालेल्या मतदानाची दुपारी दीडपर्यंतची टक्केवारी ५४.०८ इतकी होती. त्यानंतर मतदानासाठी चुरस आणखी वाढली. दुपारी साडेतीनपर्यंत ७०.६० टक्के मतदान झाले. तर साडेपाचपर्यंत यात आणखी १० टक्के मतदान वाढले. त्यानुसार मतदानाचा अंतिम आकडा ८०.७९ टक्क्यांपर्यंत पोहोचला.

तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी (टक्क्यांमध्ये)

वेल्हे ८४.९०, भोर ८५.०८, दौंड ८३.९४, बारामती ८४.९३, इंदापूर ८३.७१, जुन्नर ८३.५२, आंबेगाव ७५.८९, खेड ७२.११, शिरूर ८४.०६, मावळ ७९.६१, मुळी ८५.८२, हवेली ७५.५६. एकूण ८०.७९

जिल्ह्यात झालेले एकूण मतदान पुरुष १२६९२१, महिला ११८२४४, इतर १, एकूण २४५१६६

Web Title: Voting strongly among villagers; 81 percent polling for 221 gram panchayats in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.