राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांवर फेसबुकवर अश्लिल शेरेबाजी;सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 05:04 PM2020-04-21T17:04:16+5:302020-04-21T17:28:59+5:30

त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की इव्हेन्ट मॅनेजर असे ट्टिव केले होते.

Vulgar language use on Facebook with political party women | राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांवर फेसबुकवर अश्लिल शेरेबाजी;सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांवर फेसबुकवर अश्लिल शेरेबाजी;सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबुक अकाऊंटवर खूपच अश्लिल भाषेत मजकूर

पुणे : एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांच्या फेसबुक पेजवर अश्लिल शेरेबाजी करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ सिंहगड रोड पोलिसांनी ६ जणांवर विनयभंग, आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे़ 
श्रीकांत घोळवे, अमोल मुळे, गणेश जाधव, दशरथ मपलेकर, आसाराम सणस, मनिष चावरीया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहे. फिर्यादी या एक राजकीय पक्षाला पदाधिकारी आहेत.

त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की इव्हेन्ट मॅनेजर असे ट्टिवट केले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर खूपच अश्लिल भाषेत मजकूर लिहिला आहे. आय लव्ह यु अशी पोस्ट करुन त्यांच्याबद्दल असभ्य भाषेत अश्लिल शेरेबाजी केली आहे. त्यामुळे आपल्या मनास लज्जा उत्पन हाईल, असे कृत्य केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संचारबंदीच्या काळात लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना काळ्जी घ्यावी असे वारंवार पोलिसांकडून आवाहन करण्यात येते. किंबहुना पोलिसांचे या संवेदनशील काळात सोशल मीडियावर खूप बारकाईने लक्ष असल्याचे देखील काही दिवसांमधील सायबर क्राईमच्या वाढत्या कारवायांमुळॆ निदर्शनास आले आहे. असे असताना सुद्धा लोक बसल्या बसल्या रिकामटेकड्या वेळी कुठेतरी व्यक्त होतात आणि त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अशाचप्रकारे पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर  अश्लील शेरेबाजी करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Vulgar language use on Facebook with political party women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.