प. पू. अमितज्योतीजी म.सा.यांचा ३४ वा दीक्षादिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:24+5:302021-02-15T04:10:24+5:30
कात्रज : जिनशासक प्रभाविका, तत्त्वचिंतिका प. पू. अमितज्योतीजी म. सा. यांचा ३४ वा दीक्षादिन बालाजीनगर-धनकवडी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात ...
कात्रज : जिनशासक प्रभाविका, तत्त्वचिंतिका प. पू. अमितज्योतीजी म. सा. यांचा ३४ वा दीक्षादिन बालाजीनगर-धनकवडी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प. पू. रमणिकमुनीजी म. सा. आदी ठाणा, प. पू. रिद्धीमाजी म. सा. आदी ठाणा, प. पू. संयमज्योतीजी म. सा. आदी ठाणा, प. पू. अनंतज्योतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या सान्निध्यात हा दीक्षादिन साजरा करण्यात आला.
१२ फेब्रुवारी १९८७ साली मीनाबेन गंगर यांनी घाटकोपर, मुंबई येथे प. पू. कुंदनऋषीजी म. सा., प. पू. आदर्शज्योतीजी म. सा. यांच्या सान्निध्यात दीक्षा ग्रहण केली. त्यानंतर त्यांचे नाव अमितज्योतीजी म सा. ठेवण्यात आले. त्यांनी ३४ वर्षांत दक्षिण महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कच, मध्य प्रदेश या ठिकाणी जैन धर्माचा प्रचार प्रसार केला आहे. त्यांना जिनशासक प्रभाविका, तत्त्वचिंतिका या उपाधीने गौरवले आहे. अतिशय सरल स्वभावी, मधुर व्याख्याती म्हणून त्या सर्वत्र प्रचलित आहेत. प. पू. रमणिकमुनींजी म.सा. यांनी अमितज्योतीजी म. सा. यांना चतुर्विध संघाच्या उपस्थितीमध्ये वात्सल्यमूर्ती उपाधी प्रदान केली.
गौतम निधीच्या धनकवडी विभागाच्या नवीन कार्यकारिणी जाहीर केली. गौतम निधीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल नहार यांनी सर्वांना शपथ दिली. या वेळी गौतम निधीचे संकलनदेखील केले. नगरसेवक प्रवीण चोरबेले, राणी भोसले, आश्विनी भागवत, बाळासाहेब धोका, दिलीप कटारिया, प्रकाश बोरा, प्रवीण श्रीश्रीमाळ, विजय नवलाखा, डॉ. रुपेश शिंगवी, अभय धोका, तुषार मुथ्था, उमेदमल धोका तसेच अनेक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष सुरेश गांधी व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
फोटो : जिनशासक प्रभाविका,तत्त्वचिंतिका प. पू. अमितज्योतीजी म.सा. यांचा ३४ वा दीक्षादिन बालाजीनगर-धनकवडी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.