वाडा आरोग्य केंद्रात 50 जणांनी घेतलाकोवीड लसीकरणाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:30+5:302021-03-17T04:10:30+5:30
खेड तालुक्यातील दुर्गम भागातील वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमार 50 जणांनी कोवीड लसीकरणाचा लाभ घेतला.कोरोना संसर्गाला प्रतिबंध म्हणुन ...
खेड तालुक्यातील दुर्गम भागातील वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमार 50 जणांनी कोवीड लसीकरणाचा लाभ घेतला.कोरोना संसर्गाला प्रतिबंध म्हणुन सध्या राज्यात शासनाच्या माध्यमातून सर्वत्र कोवीड लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन कर्मचारी यांचे लसीकरण झाल्यावर आता ६० वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे यामधील नागरिकांना शासना मार्फत मोफत लस देण्यात येत आहे.वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी लाभार्थ्यांनी नोंदणी करून या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. दर आठवड्याच्या सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी लसीकरण होणार आहे.आरोग्य सहाय्यक श्री.काशिनाथ गायकवाड, आरोग्य सेविका श्रीमती दगडे, अर्चना तांबे, शितल तिटकारे, निर्मला बोराडे, आशावर्कर सुपरवायझर लता हुंडारे,आरोग्य कर्मचारी प्रकाश पाटील आणि सर्व आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांची नोंदणी करण्यापासून लस घेईपर्यंत सहकार्य करीत आहेत. वाडा आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असून शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यानी वाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ५० डोस उपलब्ध झाल्याची माहिती दिली.
यावेळी लसीकरणाचा लाभ पुणे जिल्हा मध्य.सह.बँक माजी संचालक बाळासाहेब शेटे, सरपंच रघुनाथ लांडगे, माजी उपसरपंच ज्ञानदेव सुरकुले, पांडुरंग हुंडारे यांनी घेतला.याप्रसंगी ग्रामस्थ सुरेश क्षीरसागर, वासुदेव रावळ,जगदीश कदम आदी उपस्थित होते.