वडगावच्या स्मशानभूमीला सामाजिक बांधिलकीतून झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:59+5:302021-08-19T04:12:59+5:30

वडगाव - घेनंद गावातील स्मशानभूमी व दशक्रिया घाट भीमा-भामा नदीलगतच्या जागेत होत असतात. मात्र, त्याठिकाणी विविध समस्या निर्माण होत ...

The Wadgaon cemetery was ablaze with social commitment | वडगावच्या स्मशानभूमीला सामाजिक बांधिलकीतून झळाळी

वडगावच्या स्मशानभूमीला सामाजिक बांधिलकीतून झळाळी

Next

वडगाव - घेनंद गावातील स्मशानभूमी व दशक्रिया घाट भीमा-भामा नदीलगतच्या जागेत होत असतात. मात्र, त्याठिकाणी विविध समस्या निर्माण होत होत्या. या समस्या सोडवण्यासाठी माजी उपसरपंच मारुती बवले व त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत दुरुस्तीची कामे हाती घेऊन मार्गी लावली आहेत. प्रारंभी स्मशानभूमीत कॉंक्रिटीकरण करून त्यावरील शेडचे रंगकाम केले. स्मशानभूमीच्या बाजूला निर्माण झालेल्या जागेतील खड्ड्यांची दुरुस्ती केली. तर स्मशानभूमीपर्यंत विविध अवजड साहित्य घेऊन जाताना रस्त्याची निर्माण होणारी अडचण दूर केली आहे. तसेच अंत्यविधी आणि दशक्रियासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहन पार्किंगची समस्या सोडविली आहे.

या कामासाठी माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तापकीर, माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बवले, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान बवले, प्रभाकर बवले, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष तुषार बवले, माजी ग्रामपंचायत सदस्य चरणदास नितनवरे, ॲड. शाम बवले, ग्रामपंचायत सदस्य अमोल नितनवरे, संपत बवले, माधव बवले आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.

१८ शेलपिंपळगाव

वडगाव - घेनंद (ता. खेड) येथील स्मशानभूमीची बवले कुटुंबीयांकडून दुरुस्ती करण्यात आली.

Web Title: The Wadgaon cemetery was ablaze with social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.