वडगाव शेरी, खराडीत चार रुग्णांमागे एक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:34+5:302021-04-02T04:11:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या हवामान बदलामुळे आजारी व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. दवाखान्यात सर्दी, ...

Wadgaon Sheri, a coronet behind four patients in Kharadi | वडगाव शेरी, खराडीत चार रुग्णांमागे एक कोरोनाबाधित

वडगाव शेरी, खराडीत चार रुग्णांमागे एक कोरोनाबाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या हवामान बदलामुळे आजारी व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. दवाखान्यात सर्दी, खोकला, ताप, अंग दुखी अशी कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपाणीसाठी गर्दी मोठया प्रमाणावर वाढू लागली आहे. यातल्या दर चार रुग्णांमागे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याचे निरीक्षण वडगावशेरी-खराडीतील वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे नोंदविले आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करणे हा उपाय असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून वडगावशेरी, खराडी तसेच नगर रस्ता भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. वडगावशेरीत १ हजार ३६५ पेक्षा जास्त तर नगररस्ता भागात १ हजार २०५ हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. सकाळी आणि संध्यकाळी या वेळेत ६० ते ७० एवढ्या मोठ्या संख्येने दवाखान्यात तपासणीसाठी येऊ लागले आहेत. यापैकी काही रुग्णांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगिलते असता ४ रुग्णांच्या मागे एक रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे. संसर्गाचे प्रमाण देखील वाढले आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाला पुढील उपचार घेण्यासाठी तात्काळ खाट मिळत नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना छोट्या रुग्णालयात दाखल करून घेण्याचे टाळले जाते. दिवसभर फिरून सुद्धा खाजगी रुग्णलयात खाट मिळणे अवघड होत आहे. तसेच कोरोनासदृश्य लक्षणे नसतानाही रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत.

कोट

“तपासण्या वाढविण्याची गरज आहे. सध्या वातावरण बदलामुळे रुग्ण वाढत आहेत. पहिल्यापेक्षा संसर्गाचा वेग वाढला आहे. खराडीत रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.”

-डॉ. श्रीकांत दिघे.

कोट

“कोरोना रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावाच लागेल. सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.”

- डॉ . भाऊसाहेब जाधव.

कोट

“महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यानुसार खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेतले जाणार आहेत. एका केंद्रावर कोरोनाची १०० तपासणी करण्याची मर्यादा वाढावी किंवा खाजगी रुग्णालयांना कोरोना तपासणीची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.”

- सुनील टिंगरे, आमदार वडगाशेरी मतदार संघ.

कोट

“या भागात कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोना सेंटरवर लसीकरण मोहीम सुरु करावी. आता ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार असल्याने लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. वाढती रुग्ण संख्या काळजी वाढवणारी आहे.”

- संतोष भरणे, सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: Wadgaon Sheri, a coronet behind four patients in Kharadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.