लसीकरणात वडगाव काशिंबेग तालुक्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:54+5:302021-07-01T04:08:54+5:30
अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्रामुळे राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग या गावात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली आहे. सुरुवातीला ...
अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्रामुळे राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग या गावात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली आहे. सुरुवातीला ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी कोविशिल्ड ही कोरोना लस पुरेशी उपलब्ध करून दिली. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी लागोपाठ तीन दिवस शिबिर घेण्यात आले. गावातील ग्रामस्थांचे १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी नियोजन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तीन दिवसांत पंधराशे नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यामुळे वडगाव काशिंबेग गावात ९० टक्के कोरोना लसीकरण झाले असून हे गाव लसीकरणाच्या बाबतीत सध्या तालुक्यात अव्वल ठरले आहे.विशेष म्हणजे, 45 वर्षांच्या पुढील अनेक नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.डॉ.तुषार पडवळ, नीलम घोडके यांनी नागरिकांचे लसीकरण केले आहे. आशा वर्कर आशा वाळुंज, सुषमा वाळुंज,आरती पिंगळे, तसेच गांजे यांनी आता घरोघर सर्वेक्षण सुरू केले आहे.
गावातील केवळ दोनशे नागरिकांचे लसीकरण राहिले असल्याचा अंदाज आहे. त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे.यातील अनेक ग्रामस्थांनी दुसऱ्या गावात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे टक्केवारी वाढू शकते.अशी माहिती आरोग्य सेविका अर्चना निंबाळकर यांनी दिली आहे.
माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला.वडगाव काशिंबेग गावात मागील दीड वर्षात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.तर काही जणांचा कोरोमुळे दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.आता कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्ण संख्या कमी झाल्याचे पाहावयास मिळते.