वढु बुद्रुकला उधोबा पॅनेलचा विजयी चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:55+5:302021-01-19T04:11:55+5:30
कोरेगाव भीमा: छत्रपती शंभुराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) मध्ये चुरशीच्या निवडणुकीत श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलने ...
कोरेगाव भीमा: छत्रपती शंभुराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) मध्ये चुरशीच्या निवडणुकीत श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा मिळवत वर्चस्व राखले, तर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. वढू ग्रामपंचायतीवर गेली वीस वर्षे उधोबा महाराज पॅनेलची सत्ता राखीत विजयी चौकार लगावला आहे.
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप नेते व माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या नेतृत्वाखालील श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व राखले. विजयी उमेदवारांत श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलचे हिरालाल जगन्नाथ तांबे, राहुल मारुती ओव्हाळे, अनिल भाऊसाहेब शिवले, ज्ञानेश्वर हरिभाऊ भंडारे, कृष्णा दत्तात्रय आरगडे, अंजली प्रफुल शिवले, सारिका अंकुश शिवले, सुरेखा सोनेश शिवले, संगीता शांताराम सावंत आदींचा समावेश आहे. तर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलमध्ये अनिल जनार्दन भंडारे, शिलावती धनंजय भंडारे, अनिता नितीन भंडारे व रोहिणी विजय भंडारे आदींचा समावेश आहे.
माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या पत्नी अंजली प्रफुल्ल शिवले यांनी विरोधी उमेदवार संध्या जालिंदर भंडारे यांचा १७६ मतांनी पराभव केला तर माजी सरपंच अंकुश शिवले यांच्या पत्नी सारिका शिवले यांनी स्वाती संजय सावंत यांचा ३६५ विरोधी मतांनी पराभव केला तर व अनिल भंडारे यांनी गोरख शिवले याचा २८० मतांनी पराभव केला. निकालानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोषात विजयांचा आनंद साजरा केला.
सर्वांगीण विकासाची वाटचाल कायम ठेवू
विकासाचा विजयी चौकार
श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील विकासाच्या जोरावर श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलने सलग चार पंचवार्षिक निवडणुका जिंकण्यात यशस्वी झाले असून गावचा यापुढेही सर्व घटकाला न्याय देत सर्वांगीण विकासाची वाटचाल कायम ठेवू, अशी ग्वाही माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी दिली.
१८ कोरेभागाव भीमा वढु बुद्रुक
श्री उधोबा महाराज ग्रामविकास पॅनेलच्या विजयाचा जल्लोश करताना नवनिर्वाचित सदस्य.