वाघोली-पारगाव पीएमपीएलएम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:35+5:302021-09-26T04:11:35+5:30

वाघोली ते पारगाव ही बससेवा लवकर सुरू व्हावी असे मागणी करणारे निवेदन दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासमवेत ...

Wagholi-Pargaon PMPLM will start | वाघोली-पारगाव पीएमपीएलएम सुरू होणार

वाघोली-पारगाव पीएमपीएलएम सुरू होणार

Next

वाघोली ते पारगाव ही बससेवा लवकर सुरू व्हावी असे मागणी करणारे निवेदन दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासमवेत पोपटराव ताकवणे यांनी व्यवस्थापक लक्ष्मीनारायण शुक्ला यांना दिले आहे. वाघोलीपासून पुढे पीएमटी बससेवा सुरू करण्यास व्यवस्थापक शुक्ला यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पीएमटी बससेवा लवकरच सुरू होईल. गेल्या अनेक वर्षांपासून वाघोली ते राहु बससेवा सुरू आहे. पारगाव हे राहूपासून १२ किलोमीटर अंतरावरती आहे. ही बस सेवा सुरू झाल्यास याचा लाभ रस्त्यावरील पिंपळगाव, देलवडी, लडकतवाडी, वाळकी, नागरगाव, नानगाव आदी गावांना होणार आहे. पारगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना याचा दळणवळणासाठी तसेच वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार असल्याने खूप मोठा फायदा होणार आहे. यावेळी विजय चव्हाण व शांताराम बांदल उपस्थित होते.

२५ केडगाव

लक्ष्मीनारायण शुक्ला यांना निवेदन देताना रमेश थोरात, पोपटराव ताकवणे व इतर.

Web Title: Wagholi-Pargaon PMPLM will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.