महावितरण चा विरोधात वाघोलीच्या नागरिकांचे उपोषण.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:29 PM2021-03-25T14:29:49+5:302021-03-25T14:33:31+5:30
लाईट जात असल्याने वर्क फ्रॉम होम मध्ये अडचणी. जास्त बिल आणि वीज जोड तोडण्याला वैतागले नागरिक.
वाढत्या कोरोना मुळे ऑफिस ला जाताना येईना आणि घरात लाईट जात असल्याने काम करता येईना अशी अवस्था वाघोलीकरांची झाली आहे. वारंवार तक्रार करून देखील ही परिस्थिती बदलत नाही हे लक्षात आल्यावर आता वाघोलीकरांनी या प्रश्नावर थेट आंदोलन सुरु केला आहे. वाघोलीचा रहिवासी नागरिकांनी १५ तारखेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.
वाघोलीचा समावेश पुणे महापालिकेचा हद्दीत येण्याचा प्रस्ताव आला तरी इथल्या बेसिक नागरी समस्या सुटायला तयार नाहीयेत. वारंवार एका एका प्रश्नावर प्रश्नाचे लक्ष वेधून देखील अनेक प्रश्न सुटायला तयार नाहीत. आणि वाघोलीकरांचा मते आता यात भर पडली आहे ती वीजपुरवठ्याचा अडचणींची. वर्क फ्रॉम होम करताना सतत वीजपुरवठा खंडित होण्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आता थेट उपोषण सुरु केले आहे. १५ मार्च पासून या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.
उपोषण करण्याची वेळ का आली हे सांगताना एक रहिवासी म्हणाले " वर्क फ्रॉम होमी करताना अचानक लाईट गेली की काम करताना अडचणी येतात. वायफाय बंद पडते. त्यातच आता मोठ्या मोठ्या रकमांचे बिल आले. त्यातच आता बिल भरला नाही म्हणत विजेचे कनेक्शन कट करायला सुरुवात करण्यात आली आहे. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली आहे."
याविषयी बोलताना वाघोलीचे रहिवासी संजीव पाटील म्हणाले "आम्ही यासंदर्भात महावितरण चा अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला आहे. पण प्रश्न सुटत नाहीये त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे."