वाघोलीची वॉर्डरचना, आरक्षण जाहीर

By Admin | Published: June 28, 2017 04:17 AM2017-06-28T04:17:57+5:302017-06-28T04:17:57+5:30

सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वाघोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची वॉर्डरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले.

Wagholi wardrankan, reservation reservation | वाघोलीची वॉर्डरचना, आरक्षण जाहीर

वाघोलीची वॉर्डरचना, आरक्षण जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वाघोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची वॉर्डरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले. ३४ गावांचा महापालिकेत समावेश होणाऱ्या गावांमध्ये वाघोलीचादेखील समावेश असल्याने आगामी निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
वाघोली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चालू वर्षाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या वतीने मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वॉर्डरचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. १७ सदस्यसंख्या असलेल्या वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. पुणे शहरालगत असल्याने सुमारे दीड लाखाच्या आसपास नागरिकांचे वास्तव्य आहे. मंडलाधिकारी शिवाजी जाधव व तलाठी संजय भोर यांच्या उपस्थितीमध्ये वॉर्डरचना व आरक्षण जाहीर करण्यात आले. या वेळी उपस्थित बहुतांश नागरिकांनी या सोडतीवर समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वॉर्डरचनेला ३ जुलैपर्यंत उपलब्ध करण्यात येईल, तर आक्षेप असणाऱ्या नागरिकांना हरकत घेण्यासाठी ४ ते ११ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. जुन्या वॉर्डरचनेनुसार सर्वात मोठा असणाऱ्या सहा क्रमांकाच्या वॉर्डचे नवीन वॉर्डरचनेमध्ये विभाजन करून काही भाग वॉर्ड क्रमांक एक व पाचला जोडण्यात आला आहे. भौगोलिकदृष्ट्या वॉर्ड क्रमांक पाच आलेल्या व एक मोठे वॉर्ड झाले आहेत. लोकसंखेच्या अनुमानाने वॉर्ड क्रमांक एक व सहा मोठे होणार आहेत. वॉर्ड क्रमांक एकमध्ये गेल्यावेळी २ सदस्य होते. या वेळी वॉर्ड क्रमांक दोनमध्ये २ सदस्य आहेत, तर वॉर्ड क्रमांक एकमध्ये ३ सदस्य आहेत.
एकीकडे महापालिकेमध्ये वाघोलीचा समावेश करण्यामध्ये सकारात्मक असताना पंचवार्षिक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने महसूल विभाग कार्यरत झाला आहे. महापालिकेमध्ये समाविष्ट होत असलेल्या गावामधील वॉर्डनिहाय आरक्षणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ३४ गावांबद्दल शासन सकारात्मक असताना वाघोलीची वॉर्डनिहाय रचना व आरक्षण जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Wagholi wardrankan, reservation reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.