पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी 'वेट अँड वॉच'; मात्र ' या ' अधिकाऱ्यांच्या नावांची आहे जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 07:18 PM2020-08-10T19:18:35+5:302020-08-10T19:19:33+5:30
पुण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची निवड
पुणे : जिल्हाधिकारीनवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सोमवारी त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
नवलकिशोर राम यांनी देखील सोमवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकारीपदी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर राजेंद्र देशमुख, जी श्रीकांत याची नावे आघाडीवर आहेत.
----
जिल्हाधिकारी म्हणून पत्रिकेत कुणाचे नाव टाकायचे.. थोड थांबा
पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु शासनाकडून कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. यामुळे 15 ऑगस्टच्या शासकीय कार्यक्रमात नक्की जिल्हाधिकारी म्हणून कुणाचे नाव टाकावे असा संभ्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांनी पडला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. जयश्री कटारे यांनी पत्रिका छापण्यासाठी एक दिवस थांबा अशा सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या.