वडगावशेरीतील चांगल्या रस्त्यांची लावली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:15+5:302021-02-25T04:13:15+5:30
वडगावशेरी मतदार संघातील सुंदराबाई शाळा ते साईनाथनगर, वडगाव शेरी भाजी मंडई ते जुना मुंढवा रोड, इनोर्बिमॉल ते शिवांजली मंगल ...
वडगावशेरी मतदार संघातील सुंदराबाई शाळा ते साईनाथनगर, वडगाव शेरी भाजी मंडई ते जुना मुंढवा रोड, इनोर्बिमॉल ते शिवांजली मंगल कार्यालय, रामवाडी ते वेल्फिल्ड, संगमवाडी रोड ते येरवडा, गोल्फ चौक ते जेल रोड, सिम्बायोसिस ते एअरपोर्ट रोड या मुख्य रस्त्यावर रिलायन्स रिलायन्स जिओ कंपनीकडून अनधिकृत खोदाई करून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आलेले आहेत.
यासाठी करण्यात आलेली खोदाई ही पालिकेच्या खोदाई धोरणाला अनुसरून नाही. त्यामुळे हे पूर्ण कामच अनधिकृत आहे. या अनधिकृत कामावर तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करून ही कारवाई करायला भाग पाडू, असा इशारा असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला.
चौकट
२५० कोटी रुपयांचा कर बुडवणारी रिलायन्स जिओ
कल्पेश यादव यांनी महापालिकेचा महसूल या कंपनीने बुडवला असून त्याची रक्कम जवळपास २५० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. रिलायन्स इन्फ्राटेल लि. या कंपनीचे असंख्य टॉवर आहेत. २०१७ -२०१८ पासून या कंपनीने एकही रुपया मिळकत कर आकारणी स्वरुपात महापालिकेला दिलेला नाही. एकूण २५० कोटी रुपयांची या कंपनीची कर रक्कमेची थकबाकी आहे. पण या कंपनीवर विशेष वरदहस्त महापालिकेचा आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला.
फोटो ओळ:-वडगावशेरीत मोबाईल कंपन्यासाठी तोडण्यात येत असलेले नवीन रस्ते.