Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी
By विवेक भुसे | Published: September 8, 2023 11:13 AM2023-09-08T11:13:24+5:302023-09-08T11:13:34+5:30
पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती, त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता
पुणे: गेले कित्येक दिवस प्रतिक्षा असलेल्या मॉन्सूनची पुन्हा सुरुवात झाली असून भीमा, कृष्णा खोर्यात पावसाने गुरुवारी सायंकाळपासून जोरदार सलामी दिली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडताना दिसत आहे़.
पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती. त्यातून धरणांमधीलपाणीसाठा कमी होऊ लागला होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील धरणे पूर्ण भरलेली नसल्याने खालच्या उजनी धरणातील पाणीसाठा वाढू शकत नव्हता. सर्वांना पावसाची प्रतिक्षा असताना गुरुवारी सायंकाळपासून पावसाचे पुनरागम झाले आहे. पवना धरणाच्या परिसरात गेल्या २४ तासात ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले आहे़. पुणे जिल्ह्यातील अनेक धरण क्षेत्रात जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. निमगिरी येथे १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नारायणगाव ६९, खेड ४१.५, राजगुरुनगर २५.५, तळेगाव २३.५, चिंचवड २२, ढमढेरे १८, आंबेगाव १६, लवळे १५.५, पाषाण १४.५, भोर ११.५, एनडीए ११, शिवाजीनगर १०.५, वडगाव शेरी १०.५, लवासा ९.७ कोरेगाव पार्क ९ मिमी पासाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व धरणातील पाणीसाठा (टक्केवारी)
माणिकडोह - ६० मिमी, ६३ टक्के
पिंपळगाव जोगे : ४० मिमी, ६८ टक्के
येडगाव : ४२मिमी, १९ टक्के
वडज : ४३ मिमी, ९१ टक्के
डिंबे : ५६ मिमी, ९२ टक्के
घोड : ४ मिमी, १९ टक्के
विसापूर : ७ मिमी, २२ टक्के
चिल्हेवाडी : २६ मिमी, ५९ टक्के
कळमोडी : ३२ मिमी, १०० टक्के
चासकमान : २४ मिमी, ९८ टक्के
भामा आसखेड : २० मिमी, ८९ टक्के
वडिवळे : ६८ मिमी, १०० टक्के
आंद्रा : ३० मिमी, ९९ टक्के
पवना : ७३ मिमी, १०० टक्के
कासारसाई : २२ मिमी, १०० टक्के
मुळशी : ३२ मिमी, ८७ टक्के
टेमघर : १० मिमी, ८० टक्के
वरसगाव : ४ मिमी, ९९ टक्के
पानशेत : ५ मिमी, ९९ टक्के
खडकवासला : १ मिमी, ४५ टक्के
गुंजवणी : ३ मिमी, ८८ टक्के
निरा देवघर १ मिमी, ९९ टक्के
भाटघर : २ मिमी, ९५ टक्के
वीर : ० मिमी, ५९ टक्के
नाझरे : ० मिमी, ०० टक्के पाणीसाठा
उजनी : ३ मिमी, १८ टक्के