जिरायतीला पावसाची प्रतीक्षाच
By admin | Published: October 5, 2016 01:38 AM2016-10-05T01:38:33+5:302016-10-05T01:38:33+5:30
शहरासह तालुक्याच्या बागायती भागात यंदा पावसाने सरासरी ओलांडली; मात्र जिरायती भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
बारामती : शहरासह तालुक्याच्या बागायती भागात यंदा पावसाने सरासरी ओलांडली; मात्र जिरायती भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वीर, भाटघर या धरणांतून कोट्यवधी लिटर पाणी नीरा नदीत सोडण्यात येत आहे. जिरायती भागापासून ही नदी अवघ्या ८ ते १० किलोमीटर अंतरावरून वाहते. या नदीचे पाणी कऱ्हा नदीत सोडून नद्याजोड प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली जात आहे.
स्थिरीकरण योजनेचे काम रखडले...
कांबळेश्वर (ता. बारामती) येथे बॅरेज टाकून (छोटे धरण) ३ टीएमसी पाणी साठविण्याची क्षमता राखण्यात येणार होते. ते पाणी जिरायती भागाकडे वळविल्यास त्या परिसरातील बंधारे भरण्यास मदत होईल; परंतु सध्या ते काम रखडले आहे. त्याचबरोबर नीरा डावा कालव्यातूनदेखील आवर्तन देण्यात येत आहे. पणदरेच्या परिसरातून हा कालवा जातो.