धोरणाच्या प्रतीक्षेत फुटला कालवा, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:02 AM2018-10-01T01:02:21+5:302018-10-01T01:02:57+5:30

शासन धोरणात बदल करण्याची आवश्यकता

Waiting for the policy, a shovel canal, shocking information | धोरणाच्या प्रतीक्षेत फुटला कालवा, धक्कादायक माहिती समोर

धोरणाच्या प्रतीक्षेत फुटला कालवा, धक्कादायक माहिती समोर

Next

पुणे : पाटबंधारे विभागाकडून उंदीर, घुशी व खेकड्यांमुळे कालवा पोखरला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात शासकीय धोरणच कालवा ‘पोखरत’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे कालवा दुरूस्तीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही. अखेर अनेक वर्षे तग धरून राहिलेला कालवा फुटला. त्यामुळे शासन धोरणात बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पुणे शहर परिसरातील मोठ्या लोकवस्तीतून जाणाऱ्या खकडवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याची दुरूस्तीची कामे करणे आवश्यक असल्याची बाब सिंचन विभागाच्या निदर्शास आली होती. त्यामुळे कालवा दुरूस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी जलसंपदा विभागातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, शासनातर्फे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. शासकीय नियमावलीच्या चौकटीत प्रस्ताव बसत नसल्याने तो नामंजूर करण्यात आला होता. कालव्याच्या दुरूस्तीसाठी अजूनही शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आणखी किती ठिकाणी कालवा फुटून दुर्घटना घडल्यानंतर शासनाकडून निधी दिला जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाला देण्यात आलेल्या एकूण निधीपैकी केवळ २ टक्के निधीच जलसंपदा विभागाला कालवा व इतर बाबींच्या दुरूस्तीसाठी वापरता येईल, अशी शासकीय तरतूद आहे. मात्र, खडकवासला ते इंदापूरपर्यंत असलेल्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ३० ते ४० कोटींचा निधी लागणार आहे. हा निधी एकूण निधीच्या २ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. परिणामी कालव्याचे काम होऊ शकले नाही, असे सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत खडकवासला ते इंदापूर दरम्यान असणारा कालवा हडपसरजवळ व ग्रामीण भागात शेतकºयांच्या शेतामध्ये फुटला आहे. मात्र, दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याने आणि त्यामुळे लोकवस्ती प्रभावित झाल्याने त्याची गंभीरता अधिकपणे लक्षात आली. मात्र, जलसंपदा विभागाने कालवा फुटणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, असेही बोलले जात आहे.

कर्मचाºयांचा तुटवडा : गस्त पुन्हा एकदा सुरू करण्याची आवश्यकता

जलसंपदा विभागातच नाही तर सर्वच शासकीय विभागात कर्मचाºयांचा तुटवडा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पूर्वी इंदापूर, दौंड, पाटस, केडगाव, रावणगाव, लोणी आदी ठिकाणचे जलसंपदा विभागाचे कर्मचारी नियमितपणे कालव्याची तपासणी करत होते.

शहरात स्वारगेट, नारायण कोठी, धायरी, खडकवासला या कार्यालयातील कर्मचारी कालव्याची गस्त घालत होते. परंतु, त्यात खंड पडल्याने कालवा फुटण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे कालव्यावरील गस्त पुन्हा एकदा नियमितपणे सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे सिंचन विभागातील अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.

1 कालवा बांधल्यापासून अनेक वर्षे सिंचन विभागातील कर्मचाºयांकडून कालव्याची गस्त घातली जात होती. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कालव्या खचला आहे. कुठे पाणी वाहून गेली आहे. कालव्याजवळ कोणती झाडे वाढली आहेत. याबाबतची माहिती घेण्यासाठी सिंचन विभागाकडून कर्मचारी नियुक्त केले जात होते.

2दूरध्वनी किंवा दुचाकी वाहने उपलब्ध नसल्याने सायकलवरून किंवा पायी कालव्याची तपासणी केली जात होती. परंतु, मोबाइल व दुचाकी व चारचाकी वाहने आल्याने कालव्याची वरचेवर केली जाणारी तपासणी बंद झाली.

3कालवा फुटण्याचा दोष उंदीर, घुशी व खेकड्यांना दिला जात आहे. एका रात्रीत किंवा एका दिवसात या प्राण्यांनी कालवा पोखरला नाही. त्यामुळे कालव्याची तपासणी नियमितपणे होत नव्हती, यास दुजोरा मिळत आहे.

Web Title: Waiting for the policy, a shovel canal, shocking information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे