पुण्याहून दिल्ली, अहमदाबाद व सोलापूरसाठी वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:10 AM2021-09-11T04:10:49+5:302021-09-11T04:10:49+5:30
मुंबईचे तिकीट मात्र उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ...
मुंबईचे तिकीट मात्र उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईसाठी आरक्षित तिकीट उपलब्ध आहे. मात्र दिल्ली, अहमदाबाद व सोलापूरसाठी मात्र वेटिंग सुरू आहे. यासह कोल्हापूर, चेन्नई, कोलकाताला जाणाऱ्या गाड्यांना देखील वेटिंग सुरू आहे. यात लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच तिकिटाच्या सर्व श्रेणीचा समावेश आहे.
पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंद्रायणी,डेक्कन क्वीन, व डेक्कन एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे ह्या गाड्यांना आरक्षित तिकीट उपलब्ध आहे. नेहमी ह्या गाड्यांना गर्दी असते. मात्र गणपतीच्या काळात अनेक पुणेकरांनी मुंबईला जाणे टाळले असेच दिसते. तर दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. यात गोवा एक्सप्रेस व पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेसचा समावेश आहे. या दोन्ही गाडीच्या सर्व श्रेणीचे तिकीट वेटिंग आहे.
बॉक्स 1 .
सध्या सुरू असलेल्या गाड्या :
पुणे - जम्मू-तावी झेलम एक्सप्रेस, पुणे - दानापूर ,पुणे - बिलासपुर, पुणे - जयपूर, डेक्कन ,डेक्कन क्वीन, इंद्रायणी, पुणे- नागपूर, पुणे-हावडा, पुणे -वेरावल, पुणे - निझामुद्दीन, पुणे -दरभंगा, पुणे - गोरखपूर आदी गाड्या धावत आहेत.
बॉक्स २
पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी हुतात्मा व इंटरसिटी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी सोलापूरला जाण्यासाठी पर्यायी गाड्यांचा वापर करीत आहे. यात कोणार्क एक्सप्रेस, कुर्ला - कोईंबतूर , उद्यान एक्सप्रेस, यासह अन्य गाड्यांना देखील वेटिंग आहे. यासह चेन्नई, हैदराबाद, बेंगुळुरुला जाणाऱ्या गाड्यांना देखील वेटिंग सुरू असल्याने आरक्षित तिकीट मिळणे अवघड झाले आहे.
बॉक्स 3
प्रवासी वाढले :
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांच्या सिटिंग व स्लीपर श्रेणीला जास्त वेटिंग आहे. तर उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्याच्या एसी कोचमध्ये देखील वेटिंग जास्त आहे. जवळपास ३० टक्के प्रवासी वाढले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये बहुतांश वेळा उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना जास्त वेटिंग असते. आता मात्र दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांना देखील वेटिंग असल्याने आरक्षित तिकीट मिळणे अवघड बनले आहे.