रुग्ण, नातेवाईकांसाठी उभारले प्रतीक्षा कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:19+5:302021-04-19T04:09:19+5:30
बारामती शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा उपरुग्णालयात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. रुग्णालयाची कार्यव्यवस्था पूर्ण होईपर्यंत त्यांना ...
बारामती शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा उपरुग्णालयात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. रुग्णालयाची कार्यव्यवस्था पूर्ण होईपर्यंत त्यांना बेड मिळेपर्यंत बाहेर उन्हाचा पारा वाढत आहे. रुगणांना व नातेवाईकांना या कडक उन्हात उभे राहावे लागते तर अनेक वेळा उघड्यावर रात्र काढावी लागते, ही बाब लक्षात आल्यावर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी येथील सिल्वर ज्युबली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या उपचाराची व्यवस्था होईपर्यंत आराम मिळावा यासाठी डॉ. सदानंद काळे व उपाविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा करून येथे भव्य मंडप टाकून लाईटची व्यवस्था करून येथे साठ बेड टाकण्यात आलेले आहेत.त्यामुळे आता रुग्णांच्या झोपण्याची व्यवस्था होणार असून रुग्णांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांची याठिकाणी स्वतंत्र्य कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे रुगणांना गरजेच्या असणाऱ्या व्यवस्था करण्यासाठी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगरसेवक बिरजू मांढरे ,सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण, अमर महाडिक व नटराज परिवाराचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात रुग्ण व नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
१८०४२०२१-बारामती-१०
------------------------------