शिरूरच्या पश्चिम भागाला समाधानकारक पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:48+5:302021-07-25T04:09:48+5:30
वास्तविक चालू आठवड्यात मुंबई, कोकण, रायगड, कोल्हापूर तसेच मावळ लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे ...
वास्तविक चालू आठवड्यात मुंबई, कोकण, रायगड, कोल्हापूर तसेच मावळ लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी महापूर आले आहेत. अक्षरशः काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पाऊस नको म्हणायची वेळ उद्भवली आहे. मात्र शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अद्यापही मुबलक पाऊस झाला नसून नागरिकांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून या भागात पावसाची हलकी रिपरिप झाली आहे. तर हवेचे वादळ वगळता वरुणराजा रुसलेलाच आहे.
वादळात झालेल्या हलक्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना वाढीसाठी फायदा झाला आहे. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने परिसरातील ओढे-नाले कोरडे असून विहिरीतील पाणीपातळीही घटलेली आहे. शुक्रवारी व शनिवारी या भागात पावसाची बुरबुर वगळता मोठा पाऊस झाला नाही. पुढील दोन दिवस ऊन पडले तर लगेचच पिकांचे सिंचन करावे लागेल अशी परिस्थिती उद्भवेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
२४ शेलपिंपळगाव
शिरूरच्या पश्चिम भागात मुबलक पाऊस नसल्याने विहिरींची पाणीपातळी खोल आहे. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)