आठशे ते हजार हेक्टर शेतीक्षेत्राला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Published: May 28, 2017 03:45 AM2017-05-28T03:45:13+5:302017-05-28T03:45:13+5:30

सध्या नीरा डावा कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २२ मार्च रोजी सुरू झाले आहे. हे उन्हाळी आवर्तन ४५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक होते. ४५ दिवसांत नीरा

Waiting to water the area of ​​eight hundred thousand hectare | आठशे ते हजार हेक्टर शेतीक्षेत्राला पाण्याची प्रतीक्षा

आठशे ते हजार हेक्टर शेतीक्षेत्राला पाण्याची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लासुर्णे : सध्या नीरा डावा कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २२ मार्च रोजी सुरू झाले आहे. हे उन्हाळी आवर्तन ४५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक होते. ४५ दिवसांत नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन पूर्ण होण्यासाठी ४ टीएमसी पाण्याची गरज भासते. या आर्वतनाला ६५ दिवस पूर्ण झाले आहेत. ६ टीएमसी पाणी संपले तरीदेखील इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच आहे.
पश्चिम भागातील वितरिका क्र. ४२, ४३ व ४६ वरील आठशे ते हजार हेक्टर शेती भिजायची राहिली आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने या तीनही वितरिकेवरील शेतीला पाणी देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाल करावी. पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा या वितरिकेवरील शेतकऱ्यांनी दिला आहे.
वीर व भाटघर धरणातून शेतीसाठी पाणी निरा डावा कालव्यात सोडण्यात येते. निरा डावा कालवा हा पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतीला वरदान ठरला आहे. या तिनही तालुक्यातील शेती या कालव्यावर अवलंबून आहे. पुर्वी याच कालव्यातून शेतीला महिन्याला आवर्तन सुटत होते. अलीकडील काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व धरणात साठलेला गाळ यामुळे धरणसाखळीत पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी अलीकडील काळात महिन्याचे आवर्तन दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. कारण या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नीरा डावा कालवा सायफनच्या जाळ्यात अडकला आहे. ‘धरलं तर चावतयं अन् सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली आहे. अशातच सध्या २२ मार्च रोजी सुरू झालेले उन्हाळी आर्वतन हे ४५ दिवसांत तसेच ४ टीएमसी पाण्यात पूर्ण व्हायला हवे होते. ६५ दिवसांत ६ टीएमसी पाणी संपले. तरीदेखील आर्वतन पूर्ण झाले नाही. या आर्वतनात २ टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला. तरी देखील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील आठशे ते हजार हेक्टर शेतीला पाणी मिळाले नाही. या भागातील शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. शेतीला पाणी मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. या आर्वतनातील ६ टीएमसी पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या वितरिकेवरील शेतकऱ्यांनी दिला आहे. निरा डावा कालव्यावर निंबोडी (ता. इंदापूर) ते अंथुर्णे (ता. इंदापूर)या अंतरात ५० शेतकऱ्यांची पाणी पुरवठा संस्थामार्फत पाणी उचलायची परवानगी घेतली आहे. परंतु याच अंतरात कालव्यात अनधिकृत ५०० ते ६०० पाईप टाकून सायफनद्वारे पाणी चोरी होत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको
कुरवली येथील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्यावाचून जळून गेलेली आहेत. जलसंपदा मंत्री यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही पूर्ण क्षमतेने टेलला पाणी विसर्ग न केल्याने रविवारी (दि.२८ रोजी) सकाळी १० वाजता सणसर येथे रास्ता
रोको केला जाणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

मागील दोन दिवसांपूर्वी बारामती-इंदापूर राज्यमार्ग रोखून आंदोलन केल्यावर पाटबंधारे विभागाला जाग आली. त्यानंतर आधिकाऱ्यांनी या वितरिकांना जास्त दाबाने पाणी सोडले. परंतु वितरिका क्र. ४३ ला ७५० क्युसेस पाण्याची मागणी असून त्यातील फक्त ३०० क्युसेस पाणी या वितरिकेला मिळाले आहे.
या वितरिकेला सध्या ४० क्युसक्ेसने विसर्ग सुरू आहे. जर या वितरिकेवरील शेतीला पाणी देण्यासाठी दहा दिवस पाणी या वितरिकेला मिळणे गरजेचे आहे. तसेच वितरीका क्र. ४६ ला १००० क्युसेसची मागणी असताना फक्त ३५० ते ४०० क्युसेक्स पाणी मिळाले आहे.
वितरिकेला सध्या ४५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. या वितरिकेवरील शेतीला पाणी द्यायचे असल्यास बारा ते चौदा दिवस पाणी या वितरीकेंना दयावे
लागणार आहे.

शिरूर तालुक्यातील तांदळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत १३.७७, साडेअकरा
वाजेपर्यत ३५.६४, दीड वाजेपर्यत ६१.१९, चार वाजेपर्यत ७७. ४२ टक्के
तर सायकाळी साडेसहा वाजेपर्यत ९०.७४ टक्के मतदान झाले.
पुरंदर तालुक्यातील सिंगापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत २८.०८, साडेअकरा
वाजेपर्यत ५२.४९, दीड
वाजेपर्यत ७१.२७, चार वाजेपर्यत ८०.३९ टक्के
तर सायकांळी साडेसहा वाजेपर्यत ९१.२५ टक्के
मतदान झाले.
या ग्रामपंचातींच्या पोटनिवडणुकीत २६ हजार ३६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यात १२ हजार ७१८ महिला तर १३ हजार ६४३ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

Web Title: Waiting to water the area of ​​eight hundred thousand hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.