वाकी बुद्रुक - काळुस रस्ता जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:17+5:302020-12-23T04:08:17+5:30
------------ वाकी बुद्रुक :-वाकी बुद्रुक ते काळुस रस्ता कायम प्रलंबित असणारा प्रश्न अद्यापही तसाच आहे. दोन गावे जोडणारा हा ...
------------
वाकी बुद्रुक :-वाकी बुद्रुक ते काळुस रस्ता कायम प्रलंबित असणारा प्रश्न अद्यापही तसाच आहे. दोन गावे जोडणारा हा रस्ता आजही अर्धवट परिस्थितीत अडकून पडला आहे.
तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश गोरे,जि. परिषद सदस्य बाबाजी काळे व संबंधित स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार याबाबत पत्र व्यवहार करुन रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवली होती त्यातून रस्ता झाला खरा मात्र त्याचा दर्जा मात्र अतिशय निकृष्ट होता. त्यामुळे काही दिवसातच तो खराब झाला.
वाकी बुद्रुक फाटा ते पवळे वाडी पर्यंततच्या टप्प्याचे रस्त्याचे बांधण्याचे कंत्राट कटारिया यांच्याकडे दिले होते. मात्र त्यांच्याकडून हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यांच्याशी नागरिकांनी फोन वर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या या गावांत दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. मुख्य शहरांना जोडणारा हा एकमेव पर्याय असून याच रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
कोरोना संसर्ग येण्यापूर्वी या रस्त्याचे नूतनीकरनाचे काम सुरु झाले होते, तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटदारांनी रस्त्यावरील सर्व खड्डे वरच्या वर बुजवून घेतले परंतु फक्त पाच महिन्यांच्या अवधीतच या रस्त्यावरील पुन्हा एकदा सर्व खड्डे उघडे पडले असून दुर्दशा झाली आहे.
--
वाकी बुद्रुक फाटा ते पवळे वाडी पर्यंत या रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदार कटारिया हे वारंवार टाळाटाळ करत असल्या कारणाने नागरिकांची गैरसोय होत आहे.
कंत्राटदारांनी यावर लक्ष देऊन नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबवावी.
- बाबाजी काळे
जि. प.सदस्य सांडभोरवाडी-काळुस गट
--
--
लोकडाऊन मुळे कामगारांना बाहेर पडता आले नाही शिवाय रस्ता बांधायचे साहित्य खरेदी करण्यासही उशीर झाला आहे. पुढील चार दिवसांत काम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
एस. सी. कटारिया - (कंत्राटदार.)
--
फोटो : २२वाकबुद्रूक
वाकी बुद्रुक ते काळुस रस्त्यावरील खड्डे काही महिन्यांत जैसे थे.