Video: शहरातही वावरतोय! पुण्यातील सिंहगड परिसरात बिबट्याचे दर्शन
By श्रीकिशन काळे | Published: July 18, 2023 12:22 PM2023-07-18T12:22:58+5:302023-07-18T12:23:50+5:30
सिंहगड किल्ला परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक
पुणे: किल्ले सिंहगडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या मोरदरी या गावच्या हद्दीत सोमवारी बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवासी शिवानी यादव आणि गौरी यादव यांनी घराजवळून या बिबट्याचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये बिबट्या एका ठिकाणी बसल्याचे दिसत आहे.
पुण्यातील सिंहगड किल्ले परिसरात बिबट्याचे दर्शन #Pune#sinhagad#leopardpic.twitter.com/oX1hd0vN9l
— Lokmat (@lokmat) July 18, 2023
पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव परिसरात सर्रास बिबटया आढळून येतात. मात्र आता पुण्याजवळ असणाऱ्या सिंहगड किल्ला परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वीच वारजे परिसरात बिबट्या आला होता. त्याला वन विभागाच्या पथकाने पकडले होते. त्यानंतर एनडीए परिसरातही तो आढळत आहे. पुणे शहरातही फुरसुंगी, दिवे घाट, कात्रज या ठिकाणी बिबट्या घुसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.