पाण्यासाठी अडीच किलोमीटरवर पायपीट

By admin | Published: May 1, 2016 02:49 AM2016-05-01T02:49:27+5:302016-05-01T02:49:27+5:30

नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील कुडली बुद्रुक येथे पाणीपुरवठ्याची कोणतीच योजना राबवली गेली नाही. त्यामुळे जवळपास कुठेच पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने

Walking water for two and a half kilometers | पाण्यासाठी अडीच किलोमीटरवर पायपीट

पाण्यासाठी अडीच किलोमीटरवर पायपीट

Next

भोर : नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील कुडली बुद्रुक येथे पाणीपुरवठ्याची कोणतीच योजना राबवली गेली नाही. त्यामुळे जवळपास कुठेच पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने पाण्याची तीव्र टंचाई सुरू झाली आहे. महिलांना गावापासून अडीच किलोमीटरवर असलेल्या ओढ्यात ढवरा, खड्डा खोदून त्यातून पाणी भरून डोंगराची चढण चढून पाणी आणावे लागत आहे.
पाण्याअभावी पुरुष व महिलांसह मुला-बाळांचे व जनावरांचे मोठे हाल होत आहेत. हे वर्षानुवर्षे सुरू असून याकडे मात्र लोकप्रतिनिधींसह शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र अद्याप टँकरच सुरू झालेला नाही.
भोर शहरापासून ४० किलोमीटरवर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नीरादेवघर धरण भागातील डोंगरउतारावर वसलेल्या कुडली बुद्रुक गावात सुमारे ६० घरांची ३७५ लोकांची वस्ती आहे. पावसाळ््यात डोंगरउतारावरून येणाऱ्या झऱ्यातून पाण्यावर आपली तहान भागवतात. गावात शासनाची कोणतीच पाणीपुरवठा योजना राबवलेली नाही. एक बोअरवेल आहे. मात्र उन्हाळ््यात तिला पाणीच नसते. त्यामुळे दर उन्हाळ््यात मार्च ते जूनपर्यंत चार महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. गावाच्या जवळपास कुठेच पाण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने गावापासून सुमारे अडीच किलोमीटर खाली असलेल्या ओढ्यात लोकांनी एक ढवरा काढला असून त्यासाठी माजी सभापती रणजित शिवतरे यांनी मदत केली आहे. या ढवऱ्यावरून पाणी भरून महिलांना घेऊन जावे लागत आहे. काही जण पिक-अप जीपच्या मदतीने विकत पाणी घेऊन जात आहेत.

कुडली बुद्रुक गावाच्या हद्दीत छोटे पाटबंधारे विभागाकडून सुमारे २० लाख रुपये खर्चून बंधारा बांधण्याचे काम सुरू मात्र या बंधाऱ्यामुळे कुडली बुद्रुक व कुडली खुर्द या दोन्ही गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा बंधारा कुडली बुद्रुक येथील ओढ्यात बांधला असता तर गावातील नागरिक पाणी पीत असलेल्या ढवऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला असता आणि गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असता. त्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात अशी लोकांची भावना आहे. कुडली बुद्रुक गावापासून अडीच किलोमीटरवर ओढ्यात ढवरा खोदून त्यातून पाणी घेऊन जाताना महिलांचा फोटो पाठवला आहे.

शासनाकडून टंचाईग्रस्त गावात पाण्याची टंचाई आहे किंवा नाही, याची पाहणी करून नंतरच टँकर सुरू केला जाणार आहे. मात्र याला किती वेळ जाणार आणि टँकर कधी सुरू होणार, हे सांगता येत नाही. त्यामुळे महिलांना अजून किती दिवस भटकावे लागणार आहे, हे सांगता येत नाही. कुडली बुद्रुक येथे जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा योजना करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची गरज आहे तरच टंचाई दूर होणार आहे.

Web Title: Walking water for two and a half kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.