कोंढव्यातील भाग्योदय नगर येथे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:12 PM2017-10-01T12:12:03+5:302017-10-01T15:48:26+5:30

भाग्योदय नगर येथे भिंत कोसळून इंदुमती श्रीकप्पा या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

The wall of the wall collapsed at Bhagyodan Nagar in Kondhavy, killing the woman | कोंढव्यातील भाग्योदय नगर येथे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

कोंढव्यातील भाग्योदय नगर येथे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देभिंतीचा भाग शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यूजयश्री भामशंकर यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत सुरक्षाविषयक नियम पाळल्यामुळे ठेकेदार जाफर पठाण यावर कलम २८८, ३३७ व ३३८ खाली गुन्हा दाखल

कोंढवा : कोंढवा येथे जुन्या घराचे बांधकाम पाडत असताना भिंतीचा भाग शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे. मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव इंदुमती श्रीकप्पा (वय ७०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) असून या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव जयश्री बाळासाहेब भामशंकर (रा. भागोदयनगर, कोंढवा) आहे. 
कोंढवा खुर्दमध्ये असलेल्या भाग्योदय नगर मधील गल्ली नंबर १४ येथे घोडके यांच्या जुन्या दुमजली घराचे जुने बांधकाम पडण्याचे काम चालू होते. हे बांधकाम शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पाडत असताना भिंतीचा काही भाग शेजारील इंदुमती श्रीकप्पा यांच्या घरावर पडला. हा प्रकार घडला तेव्हा इंदुमती या घरात स्वयंपाक करिता होत्या. त्यांच्या भाडेकरू असलेल्या जयश्री भामशंकर ही त्याच्या बरोबर होत्या.  
पाडत असलेल्या भिंतीचा मोठा भाग श्रीकप्पा यांच्या पत्र्याच्या घरावर पडला. पत्र्याचे घर असल्याने भिंतीचा भाग कोसळून भामशंकर यांचे घराचे छप्परच खाली आले होते. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी इंदुमती व जयश्री यांना बाहरे काढले. पडलेल्या भिंतीच्या व घराच्या छप्पराखाली दबलेल्या इदुमती यांचा मृत्यू झाला, तर जयश्री भामशंकर यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 
बांधकाम पाडत असताना सुरक्षा विषयक उपाययोजना केलेली नव्हती. त्यामुळे ही घटना घडली आहे. कोंढवा पोलिसांनी बांधकाम पाडताना कोणतेही सुरक्षाविषयक नियम पाळल्यामुळे ठेकेदार जाफर पठाण (रा. शिवनेरी नगर, कोंढवा.) यावर कलम २८८, ३३७ व ३३८ खाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अजूनही कोणास अटक करण्यात आली नाही आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवकाते करीत आहेत. 

Web Title: The wall of the wall collapsed at Bhagyodan Nagar in Kondhavy, killing the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.