पाकीट केले परत

By admin | Published: January 11, 2017 02:07 AM2017-01-11T02:07:54+5:302017-01-11T02:07:54+5:30

आपण नेहमीच म्हणत असतो, पैशाच्या व संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताचं नातं रक्ताला ओळखेनासं झालं आहे. परंतु समाजात अशी काही व्यक्तिमत्त्वं

The wallet is back | पाकीट केले परत

पाकीट केले परत

Next

शेळपिंपळगाव : आपण नेहमीच म्हणत असतो, पैशाच्या व संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताचं नातं रक्ताला ओळखेनासं झालं आहे. परंतु समाजात अशी काही व्यक्तिमत्त्वं असतात की, जी पैशापेक्षा इतरांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन ती सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन समाजासमोर एक चांगला आदर्श घालून देत आहेत.
आळंदी देवाची येथील पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या संजय महादेव प्रभुणे हे दुचाकीवरून जात असताना प्रवासादरम्यान त्यांच्या खिशातील पाकीट व त्यात असणारे दीड ते दोन हजार रुपये व त्याहीपेक्षा किमती वस्तू म्हणजे त्यात असणारे पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, आधारकार्ड, एटीएम कार्ड आदींसह महत्त्वाची कागदपत्रे असलेले भरगच्च पाकीट रस्त्यात पडले.
रस्त्यावर वाहनांसह पायी प्रवास करणाऱ्यांची तोबा गर्दी. अशा गर्दीत संजय महादेव प्रभुणे यांचे नकळत रस्त्यावर पडलेले पाकीट हे येथील सद्गृहस्थ जगन्नाथ पांडुरंग जाधव यांना दिसले. त्यांनी ते उचलले व त्यात काय आहे काय नाही, या स्वार्थी वृत्तीकडे न पाहता थेट जवळच असणाऱ्या आळंदी देवाची पोलीस स्टेशन येथील कामावर असणारे ठाणे अंमलदार अरुण भोसले यांच्या स्वाधीन केले. मला हे पाकीट आत्ताच चौकात सापडले असून, ज्याचे असेल त्याला खुशाल देऊन टाकण्यास त्यांनी सांगितले. पोलिसांनी ते पाकीट सर्वांसमोर उघडले असता त्यात रोख १५७० रुपये व महत्त्वाची कागदपत्रे मिळून आली. आधारकार्डवरून प्रभुणे यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेऊन जगन्नाथ पांडुरंग जाधव यांच्या समक्ष त्यांना पाकीट स्वाधीन करण्यात आले.
या वेळी ठाणे अंमलदार अरुण भोसले, पोलीस हवालदार पृथ्वीराज पाटील, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The wallet is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.