ऊसतोड मजुराने गमावले पाकीट; युवकाच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिली आठवडाभराची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:15 PM2022-05-22T17:15:31+5:302022-05-22T17:15:40+5:30

ऊस व्यावसायिकाच्या गुऱ्हाळावर ऊस तोडणी करणाऱ्या मजुराचे रोख रक्कम चार हजार पाचशे रुपयाचे पाकिट प्रवासात गहाळ झाले.

Wallet lost by sugarcane workers The honesty of the youth earned him a week's earnings | ऊसतोड मजुराने गमावले पाकीट; युवकाच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिली आठवडाभराची कमाई

ऊसतोड मजुराने गमावले पाकीट; युवकाच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिली आठवडाभराची कमाई

googlenewsNext

रांजणगाव सांडस : रांजणगाव सांडस येथे गुराळ ऊस तोडणी करण्यासाठी नगर , नाशिक या भागातून रोजीरोटी कमवण्यासाठी कामगार आले आहेत. ऊस तोडणी कामगार दैनंदिन घरखर्च हा ऊस वाडे विक्री करून भागवत असतात. ऊस व्यावसायिक प्रमोद विठ्ठल रणदिवे यांच्या गुऱ्हाळावर ऊस तोडणी करणाऱ्या मजुराचे रोख रक्कम चार हजार पाचशे रुपयाचे पाकिट प्रवासात गहाळ झाले.  

कामगार येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरू यांना पैशाचे पाकीट सापडले का अशी विचारणा करत होता. परंतु त्याला ते पाकीट न सापडल्यामुळे कामगार ला रडू कोसळले आठवडाभर केलेली मेहनत वाया गेली व रविवार न्हावरे येथील आठवडी बाजार असल्यामुळे त्या कामगार कडे एक दमडीही शिल्लक राहिलेली नव्हती. दरम्यान या रस्त्यावरून जात असताना उमेश रणदिवे यांना ४५०० रु रस्तावर सापडले होते. हे पैसे ज्याचे आहेत त्याला मिळण्यासाठी चौकशी केली आसता काहीजण पाकीट माझेच आहे, असेच सगळे बोलत होते. पण पााकिटातील रक्कम व बोलण्यातील रक्कम यातील तफावत जाणवल्यामुळे रणदिवे यांनी ते पाकीट दिले नाही. रस्त्याने ऊस तोडणी कामगार गेले असल्याची माहिती मिळताच ऊस तोडणी टोळीचा शोध घेऊन पाकीट मध्ये किती रक्कम आहे. याची विचारपूस करून रक्कम योग्य जुळली. कामगाराला प्रामाणिकपणे उमेश रणदिवे यांनी साडेचार हजार रुपये ते पााकिट परत दिले .त्या पााकिट मिळाल्यावर कामगाराचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण त्या कामगारांच्या दृष्टीने ही रक्कम खूप मोठी होत  त्यांनी पैसे प्रामाणिकपणे परत केले. उमेश रणदिवे यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

उमेश रणदिवे यांना ऊस तोडणी कामगार यांनी एक हजार रुपये बक्षीस दिले. या बक्षीस रूपातून मिळाली रक्कम रणदिवे हे यापूर्वी एक हजार रुक्ष लागवड करून त्याची जोपासना केलेले आहे. त्यामध्ये 20 वृक्ष लागवड करणार आहे. बक्षिसाची रक्कम वृक्ष लागवडीसाठी वापरनार असल्याचे रणदिवे यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Wallet lost by sugarcane workers The honesty of the youth earned him a week's earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.