उजनीच्या वाळूमाफियांची पळापळ, ११ बोटी उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:35 AM2019-03-18T02:35:28+5:302019-03-18T02:36:20+5:30

उजनी जलाशयात अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर पुन्हा एकदा धडक कारवाई करीत तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूर तालुक्यातील शहा, सुगाव, कांदलगाव या भागात वाळूउपसा करणाऱ्या अकरा बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उद्ध्वस्त केल्या.

walu mafia's 11 boats destroyed in  Ujni river | उजनीच्या वाळूमाफियांची पळापळ, ११ बोटी उद्ध्वस्त

उजनीच्या वाळूमाफियांची पळापळ, ११ बोटी उद्ध्वस्त

Next

इंदापूर : उजनी जलाशयात अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर पुन्हा एकदा धडक कारवाई करीत तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूर तालुक्यातील शहा, सुगाव, कांदलगाव या भागात वाळूउपसा करणाऱ्या अकरा बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उद्ध्वस्त केल्या आहेत.
उजनी धरणातील पाणलोटक्षेत्रात तीन दिवसांपूर्वी भिगवण, डिकसळ, खानोटा या भागात ३८ बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर रविवारी (दि. १७) सकाळपासून उजनीमध्ये धडक कारवाई करीत एकूण अकरा वाळूउपसा करणाºया बोटींचा स्फोट करून एक कोटी रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला. एकाच आठवड्यात दुसरी कारवाई झाल्याने वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
निवडणुकीचा काळ आहे, तहसीलदार यांना जास्त कामे असल्याने त्या उजनीच्या नदीपात्राकडे फिरकणार नाहीत, असा गैरसमज या वाळूमाफियांचा झाला होता. त्यामुळे त्याचा फायदा घेत उजनीची पाणीपातळी कमी झाल्याने वाळूमाफिया रात्रंदिवस वाळूउपसा अगदी जोमाने करीत होते.
तहसीलदारांना कसलीही खबर न लागू देता, वाळूमाफिया चोरट्या मार्गाने रात्रीचा वाळू उपसण्याचा दणका लावला होता. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. ही करवाई तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यासह पोलीसपाटील शिंदे, पोलीसपाटील कांबळे, तसेच गावकामगार
तलाठी येडे, गावकामगार तलाठी
शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई
केली आहे.

जिलेटिनच्या स्फोटाने बोटी उद्ध्वस्त...

उजनी धरणाच्या जलाशयातून सतत वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रविवारी (दि. १७) दिवसभर धडक कारवाई करून जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट करून बोटी उद्ध्वस्त केल्या. गेल्याच आठवड्यात मेटकरी यांनी अशीच कारवाई केली होती, त्यामुळे वाळूमाफियांची पळापळ सुरू झाली आहे.

Web Title: walu mafia's 11 boats destroyed in  Ujni river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.