पुण्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:29 AM2019-03-12T03:29:39+5:302019-03-12T03:29:53+5:30
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटी खेळणाऱ्या मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत
पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटी खेळणाऱ्या मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत; तसेच काही भागात टोळीने राहणारी ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी प्रचंड मोठ्या व विचित्र आवाजात विव्हळल्याने नागरिकांच्या झोपेचे वांदे झाले आहे.
शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकाला जाणार कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही संख्या तब्बल दीड ते दोन लाखांच्या घरात गेली असल्याचे महपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमितपणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते; परंतु भटक्या कुत्र्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता, या उपाय-योजना खूपच अपूर्ण पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, गेल्या काही दिवसांत या भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. बिबवेवाडीतील महेश सोसायटी परिसरात काही मुले खेळत असताना, एका भटक्या कुत्र्याने लहान मुलाला चावा घेतला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. येरवडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या टोळीने रात्री मोटारसायकलवरून येणाºया एक व्यक्तीवर हल्ला केल्याची देखील घटना घटली आहे. तसेच गोखलेनगर, सिंहगड रोड भागात कुत्र्यांच्या विव्हळल्याने नागरिकांच्या झोपा उडाल्या
आहेत.
रात्री भटक्या कुत्र्यांच्या विव्हळल्याने झोपेचे वांदे
गोखलेनगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरायला जाणारे, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर तर ही भटकी कुत्री हल्ले करतातच; पण गेल्या काही दिवसांपासून टोळीने राहणारे ही भटकी कुत्री प्रचंड विचित्र आवाजामध्ये रात्रीच्या वेळी विव्हळतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. - सुगंधा गोळे, त्रस्त नागरिक, गोखलेनगर
महिन्याला सरासरी ९०० पेक्षा अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा
सकाळी फिरायला जाणाºया, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले नवीन नाहीत; परंतु आता या कुत्र्यांकडून सोसायट्यांच्या परिसरामध्येदेखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांकडून पुणेकरांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे. सध्या शहरामध्ये महिन्याला सरासरी तब्बल ९०० पेक्षा अधिक पुणेकरांना भटकी कुत्री चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
वर्षभरात ९,२२२ कुत्र्यांची नसबंदी
महापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून नसबंदी केली जाते. यासाठी शहरामध्ये महापालिकेच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून, खासगी संस्थेच्या मदतीने ही नसबंदी केली जाते. सध्या दररोज ८० ते ८५ कुत्र्यांची नसबंदी केली जात असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांनी सांगितले. यामुळे गेल्या एक वर्षामध्ये शहरात सुमारे ९ हजार २२२ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे.