मोरांची अन्नपाण्यासाठी भटकंती
By admin | Published: April 22, 2017 03:33 AM2017-04-22T03:33:27+5:302017-04-22T03:33:27+5:30
येथील खिंडीत पक्ष्यांचा राजा असणाऱ्या मोरांनी अन्नपाण्याच्या शोधार्थ शहरी भागाकडे मोर्चा वळवला आहे. येथील शेकडो मोरांनी खाद्यान्नाच्या शोधात
लोणी धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथील खिंडीत पक्ष्यांचा राजा असणाऱ्या मोरांनी अन्नपाण्याच्या शोधार्थ शहरी भागाकडे मोर्चा वळवला आहे. येथील शेकडो मोरांनी खाद्यान्नाच्या शोधात येथून स्थलांतर सुरू केले आहे. वन विभागाने या ठिकाणी मोरांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील धामणी ग्रामस्थांनी केली आहे. धामणी खिंडीत मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे तसेच जंगलाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने अन्नपाण्याच्या शोधार्थ मोरांनी त्यांचा मोर्चा मनुष्यवस्तीकडे वळवला आहे. अन्नपाण्याच्या शोधार्थ ते स्थलांतर करू लागले आहेत. उन्हाळ्यात जंगलातच त्यांना अन्नपाणी मिळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.