बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 7, 2024 05:37 PM2024-06-07T17:37:17+5:302024-06-07T17:39:22+5:30

मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरचे अन्न देणे फार महत्वाचे. तसेच बाहेरचे फास्ट फूड टाळणे गरजेचे

Wanderings of parents with childrens company Gastro and typhoid aggravated by outside food | बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड

बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड

पुणे : मे महिन्यात मुलांना सूटया लागल्या. त्यानंतर मुले पालकांसाेबत फिरण्यासाठी बाहेर गेली. काेणी वाॅटर पार्क तर काेणी खेळाचे ठिकाणे, बागा, पिकनिक स्पाॅट तर काेणी कुठे. बाहेर गेल्यावर मज्जा करण्याबराेबरच बाहेरचे खाणेही आलेच. परंतू, हे खाणे प्रत्येकवेळी चांगले असतेच असे नाही. मग काय बच्चे कंपनीला मात्र गॅस्ट्राे अन् टायफाॅईडने ग्रासले. मे महिन्यांपासून यामध्ये वाढ झाल्याचे बालराेगतज्ज्ञ सांगतात.

वर्षभर मुले शाळांमध्ये जातात. त्यावेळी त्यांना शाळा एके शाळा आणि अभ्यासामुळे बाहेर पडता येत नाही. उन्हाळयाची सूटी लागल्यावर मात्र, मग मुलांना बाहेर फिरण्याचे वेध लागतात. या सूटयांमध्ये पालकांनाही फिरायला जायला मिळते. अशावेळी मग बाहेरचे खादयपदार्थ खाल्ले जातात. तसेच पाणीही स्वच्छ असतेच असे नाही. या स्वच्छतेच्या अभावामुळे गॅस्ट्राे तसेच टायफाॅईडचे रुग्ण मे महिन्यांपासून वाढले असल्याची माहीती सुर्या मदर ॲंड चाईल्ड हाॅस्पिटलचे नवजाततज्ज्ञ तथा बालराेगतज्ज्ञ डाॅ. सचिन शाह यांनी दिली.

मुलांचे लसीकरण करून घ्या

मान्सुनचे आगमन झाले आहे. या काळात दुषित पाणी, बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने वेगवेगळे संसर्गजन्य आजार हाेतात. तसेच, व्हायरल इन्फेक्शनही वाढते. त्यावर बालराेगतज्ज्ञांकडून फलू व्हॅक्सिन देण्यात येते. ही लस घ्यावी, असेही अवाहन बालराेगतज्ज्ञांनी केले आहे.

पावसाळयात मुलांबाबत ही घ्या काळजी

- पावसाळयात मुलांना संसर्ग हाेण्याचे प्रमाण वाढते आणि ते वांरवार आजारी पडतात. त्यासाठी फलू व्हॅक्सिन देणे गरजेचे
- डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढतात
- मुलांच्या शाळा सूरू झाल्यावर ते एकमेकांच्या संपर्कात आल्याने संसर्गाची शक्यता वाढते. त्यासाठी मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.
- मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरचे अन्न देणे फार महत्वाचे. तसेच बाहेरचे फास्ट फूड टाळणे गरजेचे आहे.
- मुलांना मैदानी खेळ खेळू देणे, व्यायाम करणे आवशक

सध्या बाहेरचे खाणे वाढल्याने मुलांमध्ये गॅस्ट्राे आणि टायफाॅईडची लागण झाल्याचे दिसून येते. याचबराेबर फास्ट फुड खाण्याचे प्रमाण वाढल्याने आणि जीवनशैलीतील बदलांमुळे मुलांमध्ये लठठपणा माेठया प्रमाणात वाढला आहे. मुलांचे लसीकरण करून घ्यावे. - डाॅ. सचिन शाह, नवजात तथा बालराेगतज्ज्ञ

Web Title: Wanderings of parents with childrens company Gastro and typhoid aggravated by outside food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.