वांगणीची मळाई देवी यात्रा या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:25+5:302021-01-23T04:11:25+5:30
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेली वांगणी येथील मळाईदेवी यात्रा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली आहे. भाविकांनी ...
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेली वांगणी येथील मळाईदेवी यात्रा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
रद्द करण्यात आलेली आहे. भाविकांनी मळाईदेवी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मळाईदेवी ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
मळाईदेवी ट्रस्टचे पदाधिकारी वांगणी ग्रामस्थ यांच्यात यात्रेसंदर्भात वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज
पवार यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. या बैठकीत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दीमुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. देवीचा छबिना, लोकनाट्याचा कार्यक्रम
कुस्त्याचा फड, पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंपरेनुसार देवीची
काठी ठराविक लोकांच्या उपस्थित निघणार आहे. दि २८ रोजी मुख्य यात्रेच्या दिवशी सकाळी ५.३०वाजता
देवीला अभिषेक घातला जाईल, होमहवन, दुपारी चार वाजता मिरवणूक व दुसऱ्या दिवशी २९ जानेवारीला
कुस्त्याची परंपरा मोडू नये म्हणून लहान मुलांच्या केवळ पाचच कुस्त्या घेतल्या जाणार आहेत, असा निर्णय
बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस देवस्थानचे विश्वस्त दिगंबर चोरघे,आकाश वाडघरे, विजय चोरघे, तानाजी चोरघे
अशोक चोरघे, रामदास चोरघे, भरत चोरघे, अविनाश चोरघे, काता महाराज चोरघे, संतोष चोरघे, कुंदन गंगावणे, कैलास
वाडघरे, भागुजी चोरघे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार उपस्थित होते.