दारुबंदी हवी आहे? मग या मोहिमेत सहभागी व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:53 PM2017-10-16T14:53:12+5:302017-10-16T14:55:59+5:30
मद्यबंदी ठरावाला पाठिंबा देण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शहरामध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. येरवड्यात मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
पुणे : पुणे महापालिकेने नुकताच शहरात मद्यबंदी करण्यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शहरामध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
या मोहिमेला महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. शहरात मद्यबंदी झालीच पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या. चौकामध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर महिलांसह नागरिकांनी स्वाक्षरी करुन पाठिंबाही दर्शविला. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, नगरसेविका अश्विनी लांडगे, आनंदवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यावेळी उपस्थित होते. ही मोहीम प्रयत्नपूर्वक सुरु ठेवण्यात येणार आहे. येत्या रविवारी येरवडा येथील गाडीतळापासून पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे दुधाणे यांनी सांगितले. यावेळी संपतराव पोळ, वैभव पवार, शैलेंद्र भोसले, आनंद रसाळ, विपुल रोकडे, विक्रांत भोसले, अनिरुध्द हळंदे , विशाल काकडे, भिमसिंग गायकवाड, सिध्दार्थ कांबळे, महेश वाडेकर, विवेक कदम, प्रकाश धिडे, प्रमोद शेळके उपस्थित होते.