ग्रामपंचायतींवर प्रशासक व्हायचंय; तर ११ हजार भरा, ‘राष्ट्रवादी’चे ते पत्रक टीकेनंतर घेतले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 01:58 AM2020-07-17T01:58:42+5:302020-07-17T01:59:35+5:30
कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रापंचायतींवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या होत्या.
पुणे : कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करून प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. जिल्ह्यात जवळपास ७५० ग्रामपंचायती आहे. प्रशासकपदास इच्छुकांकडून राष्ट्रावादी काँगे्रस पक्षाने बुधवारी ११ हजार रुपये घेण्याचा ठराव करत तसे पत्रकही काढले होते. मात्र या पत्रकावर टीका झाल्याने अखेर हे पत्रक मागे घेण्यात आले.
कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रापंचायतींवर प्रशासक नेमण्याचा आदेश राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने दिल्या होत्या. यावर जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसने बुधवारी ज्यांना प्रशासक व्हायचे आहे, त्यांनी ११ हजार पक्षाच्या बँक खात्यावर जमा करावे, असे पत्रक पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले होते. मात्र, या आदेशावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठविली. पक्षातूनही या निर्णयाला विरोध झाल्याने त्यांनी हा निर्णय गुरुवारी मागे घेतला. इच्छुकांची संख्या कमी करण्यासाठी ठराव करत हा निर्णय घेतला, असे गारटकर यांनी सांगितले.