दुप्पट पैशांचा हव्यास नडला, हाती आले ५० लाखांचे कागदी तुकडे        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 06:22 PM2021-03-16T18:22:14+5:302021-03-16T18:23:43+5:30

ब्लॅकमनी देण्याच्या नावाखाली फसवणूक

Wanted double money but got 50 lakh pieces of paper | दुप्पट पैशांचा हव्यास नडला, हाती आले ५० लाखांचे कागदी तुकडे        

दुप्पट पैशांचा हव्यास नडला, हाती आले ५० लाखांचे कागदी तुकडे        

Next

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करायला सांगून त्यात पोळलेले असताना त्यांच माणसावर विश्वास ठेवून ब्लॅकमनीचा पैसा असल्याचा भासवून तो बाळगण्यासाठी २ हजारांच्या नोटा हव्यात, त्याबदल्यात दुप्पट पैसे देण्याचे आमिषाने हुरळून केलेल्या हॉटेल व्यावसायिकाला त्याचा हव्यास चांगला भोवला आणि ५० लाखांचे कागदी तुकडे हाताशी आले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

प्रविण वनकुंद्रे (रा. काळेवाडी), महेश गावडे (रा. चिंचवड) आणि डॉ. व्यंकटरमण बाहेकर (रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याबरोबर सुनिल नारखेडे (रा. नागपूर), रेड्डी (रा. हातनाका, ठाणे) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी शिवणे येथे राहणार्‍या हॉटेल व्यावसायिकाने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी प्रविण नवकुंद्रे याच्या सांगण्यावरुन नाशिक येथील एका फायनान्स कंपनीत गुंतवणुक केली होती. मात्र, त्या कंपनीने फसविल्याने फिर्यादी हे वनकुंद्रे याला तु माझे पैसे मिळवून देत असे सांगत होते. त्यावर  वनकुंद्रे याने इतर आरोपींशी संगनमत करुन त्यांच्याकडे खूप ब्लॅकमनी आहे, असे फिर्यादी यांना भासविले. तो काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी त्यांना २ हजार रुपयांच्या नोटा हव्यात आहे. त्यामुळे त्या साठवून ठेवणे त्यांना सोपे जाणार आहे. त्यासाठी ते २५ लाख रुपयांच्या बदल्यात ५०० रुपयांच्या नोटांचे ५० लाख रुपये देतो, असे आमिष दाखविले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी २ हजार रुपयांच्या नोटांचे २५ लाख रुपये जमविले. त्याप्रमाणे त्यांना २३ फेब्रुवारी रोजी त्यांना दुपारी कसबा पेठेतील जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयाजवळ बोलावले. त्यानुसार फिर्यादी हे तेथे गेल्यावर त्यांनी आणलेले २५ लाख रुपये त्यांनी एका सुटकेसमध्ये ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पैसे ठेवल्यावर त्यांनी सुटकेस लॉक केली. त्यांनी ती बॅग कारमध्ये ठेवली. तेव्हा फिर्यादी यांच्या लक्षात आले की त्यांनी त्यांना पैसेच दिले नाही. हे त्यांनी सांगितल्यावर त्यांनी कारमधील एक बॅग काढून त्यांच्या हातात दिली. त्यानंतर आमच्यासमोर ही बॅग उघडून पाहू नका असे सांगून ते जाऊ लागले. फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी बॅग उघडून पाहिल्यावर त्यात नोटांच्या आकाराचे वर्तमानपत्राच्या कागदाचे तुकडे बंडल करुन त्यात ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पैसे परत न दिल्याने शेवटी हॉटेल व्यावसायिकाने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील अधिक तपास करत आहेत.

Web Title: Wanted double money but got 50 lakh pieces of paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.