'मॅडम, पुढे तुमचे दागिने लुटतील, काढून ठेवा' म्हणत सोन्याच्या बांगड्या लंपास, पुण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 04:56 PM2021-11-24T16:56:24+5:302021-11-24T17:13:16+5:30

याप्रकरणी वानवडीतील जांभुळकर गार्डन येथील ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे...

wanvadi jewelery looted on road 60 thousand rupees crime news | 'मॅडम, पुढे तुमचे दागिने लुटतील, काढून ठेवा' म्हणत सोन्याच्या बांगड्या लंपास, पुण्यातील प्रकार

'मॅडम, पुढे तुमचे दागिने लुटतील, काढून ठेवा' म्हणत सोन्याच्या बांगड्या लंपास, पुण्यातील प्रकार

Next

पुणे: मॅडम पुढे एका महिलेला मारहाण झाली आहे. तिचे सर्व दागिने काढून घेतले आहे. तुमचे दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करुन चौघा चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या नकळत ६० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या लांबविल्या.

याप्रकरणी वानवडीतील जांभुळकर गार्डन येथील ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडीतील चायना ग्रील रेस्टॉरंटजवळ मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला घरी पायी जात होत्या. यावेळी चौघे जण त्यांच्याजवळ आले व त्याने फिर्यादी यांना मॅडम पुढे एका महिलेस मारहाण करुन तिचे दागिने काढून घेतले आहेत. तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा, असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवल्या असता, मॅडम बघु तुम्ही दागिने नीट ठेवले का असे म्हणून फिर्यादी यांच्या बॅगेतून नजरचुकवून ६० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढून घेऊन निघून गेले.

Web Title: wanvadi jewelery looted on road 60 thousand rupees crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.